आधुनिक पद्धतीने सांडपाणी व्यवस्थापनावर भर- अशोकराव चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:20 AM2021-09-18T04:20:06+5:302021-09-18T04:20:06+5:30

नांदेड वाघाळा शहर महागनरपालिकेच्या अंतर्गत माता गुजरीजी विसावा उद्यान येथे आयसोलेटेड एमबीबीआर तंत्रज्ञानावर आधारित बांधण्यात आलेल्या मलशुद्धीकरण प्रकल्पाच्या लोकार्पण ...

Emphasis on modern wastewater management - Ashokrao Chavan | आधुनिक पद्धतीने सांडपाणी व्यवस्थापनावर भर- अशोकराव चव्हाण

आधुनिक पद्धतीने सांडपाणी व्यवस्थापनावर भर- अशोकराव चव्हाण

googlenewsNext

नांदेड वाघाळा शहर महागनरपालिकेच्या अंतर्गत माता गुजरीजी विसावा उद्यान येथे आयसोलेटेड एमबीबीआर तंत्रज्ञानावर आधारित बांधण्यात आलेल्या मलशुद्धीकरण प्रकल्पाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, महापौर मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने व इतर मान्यवर उपस्थित होते.

मलशुद्धीकरणाच्या या ९ प्रकल्पात विसावा उद्यान, अबचलनगर, आर्सजन, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी येथे तीन प्रकल्प दीड लाख लीटर क्षमतेचे आहेत. शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय येथे १ लाख लीटर, शनिघाट येथे ८ लाख लीटर तर सावित्रीबाई फुले शाळा व बाबानगर येथे २ लाख लीटर क्षमतेचे प्रकल्प आहेत. यातील विसावा उद्यान, अबचलनगर, अर्सजन व डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दोन प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. इतर ठिकाणच्या प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या प्रकल्पात भूमिगत गटारातून नाल्याचे घाण पाणी पंपिंग करून बांधण्यात आलेल्या स्टोरेज टँकमध्ये साठा करण्यात येते. साठा केलेले घाण पाणी पंपिंग करून प्रक्रियेसाठी मोठ्या टाकीत सोडण्यात येते. या टाकीत प्रक्रियेनंतर पाण्यातील घन स्वच्छ होते. हे पाणी कार्बन फिल्टरमध्ये सोडण्यात येऊन त्या पाण्यावर यूव्ही सिस्टीमद्वारे शुद्ध करून हे पाणी उद्यानातील झाडे, बांधकाम, शेती व साफसफाईच्या कामांसाठी वापरण्यायोग्य केले जाते. हे पाणी बांधकामासाठी मनपातर्फे अल्पदरात उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Web Title: Emphasis on modern wastewater management - Ashokrao Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.