‘माणसाळलेली रात्र’ ने केले अवयवदानाविषयी प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:17 AM2018-11-28T00:17:12+5:302018-11-28T00:17:30+5:30

या माध्यमातून त्या-त्या वेळच्या समस्या, अडचणींवर मात करण्याचे बळ दिले़ याचा सकारात्मक प्रतिसादही दिसत आला आहे.

Enlightenment about organisms made by 'night overnight' | ‘माणसाळलेली रात्र’ ने केले अवयवदानाविषयी प्रबोधन

‘माणसाळलेली रात्र’ ने केले अवयवदानाविषयी प्रबोधन

Next
ठळक मुद्देहौशी राज्य नाट्यस्पर्धा : परभणीची प्रबोधन सेवा संस्था चमकली

नांदेड : नाटक हे फक्त मनोरंजनाचे माध्यम नाही तर ते समाज प्रबोधनाचेही माध्यम आहे. अनेक नामवंत लेखक, रंगकर्मींनी नाटकातून समाजप्रबोधनाचे धडे दिले आहेत़ आणि या माध्यमातून त्या-त्या वेळच्या समस्या, अडचणींवर मात करण्याचे बळ दिले़ याचा सकारात्मक प्रतिसादही दिसत आला आहे. काळानुरूप लोकांचे विचार बदलले असले तरी आपल्या आजूबाजूस नवीन वेगवेगळ्या समस्या, प्रश्न उभे राहतात़ या प्रश्नावरही नाटकाच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे जनजागृती करता येऊ शकते, हे माणसाळलेली रात्र या नाटकाने दाखवून दिले़ अवयवदानाविषयी संदेश त्यांनी दिला़
परभणीच्या प्रबोधन सेवाभावी संस्थेने सादर केलेले हे नाटक उदय कातनेश्वरकर यांनी लिहिलेले असून अनुजा डावरे यांनी दिग्दर्शित केले आहे़ हे संपूर्ण नाटक एका स्मशानभूमीत घडते़ स्मशानभूमीतील मसणजोगी (उदय कातनेश्वरकर) याच्याशी विविध आत्मे थेट बोलत असतात. त्या ठिकाणी एक भुरटाचोर बाबल्या (भरड क्षिप्रसाधन) येतो़ त्याला स्मशानभूमीत जळत असलेल्या एका शवावरील दागिना लांबवायचा असतो़ या चोराचा भाऊ अपंग असतो़ त्याच्या दवाखान्यासाठी त्याला पैसे हवे असतात़ परंतु, ज्याच्यासाठी त्याला पैसे हवे असतात, तो मयत झालेला असतो याची या चोराला माहिती नसते. दरम्यान, याच स्मशानभूमीत कार अपघातात मयत झालेली निलू (ऐश्वर्या डावरे) येते़ या निलूने आपले स्वत:चे अवयवदान केलेले असतात. अशा पद्धतीने स्मशानभूमीत मसनजोग्यासह भुरटाचोर बाबल्या आणि मयत निलू एकत्र येतात़ या तिघांचेही विचार अतिशय भिन्न असतात़ मसणजोग्यास माणूस खूप दुष्ट आहे, असे वाटत असते़ तर बाबल्याचा माणसावर विश्वास असतो़ तर निलूचे मत आणखीनच वेगळे असते़ माणूस कसाही असो, आपण आपल्या पद्धतीने चांगला विचार केला पाहिजे, अशी ती सांगत असते़ या तिघांतील याच विषयावरील चर्चेतून मसणजोग्याचेही मत परिवर्तित होते़
नाटकात दिग्दर्शकाचे काम उठून दिसते़ ऋग्वेद कुलकर्णी या बालकलावंताने साकारलेली भूमिकाही लक्षवेधी ठरली़ तर भरड क्षिप्रसाधन, उदय कातनेश्वरकर, ऐश्वर्या डावरे, संकेत पांडे यांनीही आपापल्या भूमिकेस न्याय दिला आहे़ नाटकाचे नेपथ्य संकेत पांडे आणि संजय कातनेश्वरकर यांनी साकारले तर दिगंबर दिवाण यांची प्रकाशयोजना सत्याचा आभास निर्माण करणारी होती. उषाताई डावरे यांनी रंगभूषा व वेशभूषेची बाजू सांभाळली तर संगीत उपेंद्र दुधगावकर आणि मंदार कातनेश्वरकर यांनी साकारले़ दरम्यान, बुधवारी सायंकाळी ७ वाजता सरस्वती प्रतिष्ठान, नांदेडच्या वतीने राजेंद्र पोळ लिखित, सुहास देशपांडे दिग्दर्शित वारूळ या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.

Web Title: Enlightenment about organisms made by 'night overnight'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.