कृषी विभागाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रस्ताव पाठवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:17 AM2020-12-24T04:17:08+5:302020-12-24T04:17:08+5:30
महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाअंतर्गत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी शेतकरी बांधवांसाठी विविध योजनेअंतर्गत ट्रॅक्टर,ट्रॅक्टरचलित अवजारे तसेच ...
महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाअंतर्गत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी शेतकरी बांधवांसाठी विविध योजनेअंतर्गत ट्रॅक्टर,ट्रॅक्टरचलित अवजारे तसेच पावर टिलर आणि कांदा चाळ, शेततळी, शेततळी अस्तरीकरण, ठिबक संच, स्प्रिंकलर पाईप संच,पाईपलाईन, मळणीयंत्र, शेतीतील इतर अवजारे मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करून सोबत सातबारा उतारा, ८ अ उतारा, आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स,जातीचे प्रमाणपत्र, आधारशी संलग्न असलेले मोबाईल नंबर आदीसह प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन बैठकीदरम्यान येथील तालुका कृषी अधिकारी व्ही.आर. चन्ना यांनी केले आहे. सदरील प्रस्ताव दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे सदरील माहितीसाठी कृषी कार्यालय हिमायतनगर येथील कृषी सहायक,कृषी पर्यवेक्षक, कृषी मंडळ अधिकारी तालुका कृषी अधिकारी आदींकडे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.