शस्त्र परवान्याचीही फॅशन; जिल्ह्यात बाराशे परवाने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:22 AM2021-07-07T04:22:53+5:302021-07-07T04:22:53+5:30

नांदेड : जिल्ह्यात गेल्या काही वर्षात शस्त्र परवाने काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आजघडीला जिह्यात १ हजार २०० जणांजवळ शस्त्र ...

The fashion of arms licenses too; Twelve hundred licenses in the district! | शस्त्र परवान्याचीही फॅशन; जिल्ह्यात बाराशे परवाने!

शस्त्र परवान्याचीही फॅशन; जिल्ह्यात बाराशे परवाने!

Next

नांदेड : जिल्ह्यात गेल्या काही वर्षात शस्त्र परवाने काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आजघडीला जिह्यात १ हजार २०० जणांजवळ शस्त्र परवाने आहेत. परंतु यातील काही जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शस्त्र परवान्यांचा आढावा घेण्यात येतो. यापूर्वी दरवर्षी शस्त्र परवाने नूतनीकरण करण्यात येत होते. त्यासाठी शस्त्रे सोबत घेऊन यावी लागत होती. परंतु आता पाच वर्षाला शस्त्र परवाना नूतनीकरण करण्यात येतो.

जवळ शस्त्र बाळगणे हे प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते. त्यामुळे राजकीय नेते, व्यापारी यासह गुंडही कमरेला शस्त्र बाळगण्याची फॅशन करीत असताना दिसून येतात. शस्त्र परवाना काढण्यासाठीचे नियम अत्यंत कठोर आहेत. परंतु मधला मार्ग काढून अनेक जण शस्त्र परवाने काढण्यात यशस्वी होतात. तर काही जणांना गरज असतानाही अनेक वर्षे शस्त्र परवाना मिळत नाही. त्यामुळे ज्यांना शस्त्र बाळगण्याची गरज नाही, अशा शस्त्रधारी मंडळींची पडताळणी होण्याची गरज आहे. परवानाधारकाने शस्त्राचा कुठे वापर केला काय? याची शहानिशा तसेच वापरलेल्या गोळ्यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात देणे बंधनकारक आहे.

नांदेड शहरात सर्वाधिक परवाने

n जिल्ह्यात नांदेड शहरात सर्वाधिक शस्त्र परवाने आहेत. त्यात राजकीय मंडळी, व्यापारी आणि पत्रकारांचा समावेश आहे. तर काही अधिकाऱ्यांनी स्वत:च्या संरक्षणासाठी शस्त्र परवाने काढले आहेत.

n शस्त्र परवाना मिळविण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्यास काही जणांची तयारी असते. त्यासाठी अनेक वेळा ते शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवितात. परंतु किचकट प्रक्रियेमुळे शस्त्र परवाना मिळणे अवघड आहे.

शस्त्र परवाना काढायचा कसा?

तुमच्या जीवाला धोका असल्याचे सर्व पुरावे दिल्यानंतर पोलिसांकडून अहवाल मागविण्यात येतो. तसेच संबंधित व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जाते. त्यानंतरच जिल्हाधिकारी शस्त्र परवान्यासाठी मंजुरी देतात.

पाच वर्षांत वाढले परवाने

वर्षात शस्त्र परवाना काढणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुंडाकडून शहरात व्यापारी, डॉक्टर, बिल्डर यांना खंडणीसाठी धमकाविण्याचे प्रकार घडले आहेत. त्यातून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकांनी स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना काढण्यावर भर दिला आहे. यातील अनेकांना शस्त्र परवाने मिळाले आहेत. परंतु शस्त्र घेतल्यानंतर ते बाळगणे फार जिकिरीचे काम आहे.

देशी कट्ट्यांचा तर हिशेबच नाही

n शहरात सध्या अनेक गुंडांच्या टोळ्यांकडे देशी कट्टे आढळून येत आहेत. पोलिसांनी अनेक आरोपींकडून देशी कट्टे जप्त केले आहेत. अवघ्या दहा ते पंधरा हजार रुपयांमध्ये देशी कट्टे मिळतात. त्यासाठी मोठी टोळी नांदेडात सक्रिय आहे.

Web Title: The fashion of arms licenses too; Twelve hundred licenses in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.