नांदेड जिल्ह्यात आणखी पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 07:38 PM2020-10-19T19:38:37+5:302020-10-19T19:42:23+5:30
coronavirus नांदेड जिल्ह्यात उपचार घेत असलेले रुग्ण १४४६
नांदेड : मागील २४ तासात जिल्ह्यातील पाच बाधितांचा उपचारास प्रतिसाद न दिल्याने मृत्यू झाला आहे़ त्यामुळे एकूण कोरोना बळींची संख्या ४८८ एवढी झाली आहे़ तर मागील २४ तासात आरटीपीसीआर तपासणीद्वारे २६ आणि अँटीजेन तपासणीसाठी ७५ असे १०१ नवे बाधित आढळल्याने एकूण रुग्णांची संख्या १८ हजार १८० वर पोहचली आहे़
रविवारी कोरोना तपासण्या घटल्याचे दिसून येते़ त्यामुळे सोमवारी केवळ ४१३ तपासण्यांचे अहवाल प्राप्त झाले़ त्यातील २८७ निगेटीव्ह तर १०१ पॉझीटीव्ह अहवाल आले़ यामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात २०, हिमायतनगर १, मुदखेड १, नांदेड ग्रामीण २ तर भोकर आणि माहूर येथे प्रत्येकी १ रुग्ण आढळला़ अँटीजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात ६८, लोहा, देगलूर, परभणी, नांदेड ग्रामीण आणि धर्माबाद तालुक्यात प्रत्येकी एक तर नांदेड ग्रामीणमध्ये दोन नवीन रुग्ण निष्पन्न झाले़ सोमवारी जिल्ह्यातील २१२ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे़ यामध्ये विष्णुपूरी येथील वैद्यकीय महाविद्यालयातील ७, अर्धापूर ३, माहूर ६, किनवट ३, नायगाव ६, मुखेड ८, जिल्हा रुग्णालय ८, देगलूर, लोहा प्रत्येकी २ तर एनआरआय, पंजाब भवन आणि होम आयसोलेशनमधील १४२ जणांसह खाजगी रुग्णालयातील २२ जणांनी कोरोनावर मात केली़ त्यामुळे आजवर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १६ हजार १३० एवढी झाली आहे़
४५ जणांची प्रकृती गंभीर
मागील २४ तासात पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे़ यामध्ये विष्णुपूरी येथील रुग्णालयात कंधार तालुक्यातील कौठा येथील ८२ वर्षीय पुरुष, लोहा तालुक्यातील वडेपुरी येथील ७२ वर्षीय पुरुष आणि नांदेड शहरातील देगलूर नाका येथील ५२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला़ तर जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कंधार तालुक्यातील शिवाजीनगर येथील ६० वर्षीय पुरुष आणि नांदेड शहरातील बसवेश्वर नगर येथील ५४ वर्षीय पुरुषाचाही कोरोनाने बळी घेतला़ दरम्यान सोमवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात १ हजार ४४६ जणांवर विविध कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असून त्यातील ४५ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले़
आजवर घेतलेले स्वॅब ९९५९२
एकूण निगेटिव्ह ७८१३३
एकूण पॉझिटिव्ह १८१८०
कोरोनामुक्त झालेले रुग्ण १६१३०
एकूण मृत्यू संख्या ४८८
उपचार घेत असलेले रुग्ण १४४६