तालुकाध्यक्षपदी पवळे
नायगाव : मराठा सेवा संघाच्या तालुकाध्यक्षपदी अशोकराव पवळे तर कार्याध्यक्षपदी देवीदासराव जाधव व सचिवपदी संतोष कल्याण यांची निवड झाली. कार्यकारिणी अशी- कोषाध्यक्ष नारायण शिंदे, उपाध्यक्ष गंगाधर चव्हाण, तालुका प्रवक्ता नागनाथ वाढवणे, सहसचिव नागेश कल्याण, सल्लागार व्यंकटराव जाधव, जिल्हा संघटक प्रा. जीवन चव्हाण.
निधी संकलन
नायगाव : तालुक्यातील रातोळी येथे श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन कार्यास सुरुवात झाली. यावेळी आ. राम पाटील रातोळीकर, सिद्धार्थ आलूरकर आदी उपस्थित होते. तत्पूर्वी गावातून रॅली काढण्यात आली.
कर सल्लागार संघटनेकडून निषेध
नांदेड : जीएसटी कायद्याच्या जाचक तरतुदीच्या विरोधात कर सल्लागार संघटनेच्या वतीने शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. जीएसटी राज्य कार्यालयात राज्यकर उपायुक्त राहुल वळसे व प्रकाश गोपनर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष गंगाबीशन कांकर, सचिव महेश तोतला, ओमप्रकाश कोंडावार, अतुल धूत, विजय कालाणी, ॲड.सी.बी. दागडिया, बालकृष्ण मोदानी, विवेक साले यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख कर सल्लागार व सी.ए. उपस्थित होते.
रुग्णवाहिकेचे लोकार्पण
धर्माबाद : जीवन संघर्ष या रुग्णवाहिकेचे लोकार्पण भूसंपादन जिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाला तहसीलदार दत्तात्रय शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक अशोक उजगरे, पोलीस उपनिरीक्षक अनिल सनगले, वैद्यकीय अधिकारी वेणुगोपाल पंडित, उपविभागीय कार्यकारी अभियंता सुमित पांडे, उद्योजक सुबोध काकाणी, जी.बी. वाघमारे आदी उपस्थित होते.
उद्देशिकेचे वाचन
मुदखेड : राजीव गांधी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर प्राचार्य डॉ. रमेश कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व अन्य कर्मचारी उपस्थित होते.