आंबेडकरवादी मिशनमध्ये सकाळी सात ते दहाच्या दरम्यान मार्गदर्शन वर्ग प्रारंभ करण्यात आले आहेत. विशेषत: कायद्यांचा अभ्यास व मराठी व इंग्रजी या विषयांचे कंबाइन मुख्य परीक्षेचे मार्गदर्शन वर्ग तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे पूर्व परीक्षेचे मार्क हे गेल्या वर्षीच्या कट ऑफ लाईन एवढे आहेत अशा विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क निवास व्यवस्था करण्यात आली आहे. मार्गदर्शन वर्ग नि:शुल्क, निवास व्यवस्था, अभ्यासिका, ग्रंथालय या सर्व सुविधा सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क असतील.
विद्यार्थ्यांनी लस घेणे बंधनकारक असेल व कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. राज्यसेवा मुख्य परीक्षा टेस्ट सिरीजसाठी विद्यार्थ्यांनी आपली नावे नोंदवावी, यासाठी आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्र नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी केले.