नांदेड : गणरायानंतर सोमवारी घरोघरी सोनपावलांनी गौराईचे आगमन झाले. त्यामुळे घराघरात भक्तिमय वातावरण आहे. अशातच कोरोना रुग्णही आज निरंक आहेत.
जिल्ह्यात सोमवारी प्रशासनाला ६४९ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यात एकही बाधित आढळून आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ९० हजार २८२ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर, २ हजार ६६२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोमवारी दोघांनी कोरोनावर मात केल्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या आता ८७ हजार ६०० झाली आहे. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ९, मनपा अंतर्गत गृहविलगीकरणात १२, ग्रामीण भागातील गृहविलगीकरणात ६ आणि खासगी रुग्णालयात ४ जण उपचार घेत आहेत. उपचार घेत असलेल्या ३१ जणांपैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे. कोरोनामुळे मयतांची संख्याही आता घटली आहे.