जि.प.शाळेची तिसरी इमारतही पाडण्याचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 12:40 AM2019-03-09T00:40:28+5:302019-03-09T00:41:21+5:30
किनवट नगरपरिषदेने निजामकालीन मुलींची कन्याशाळा जमीनदोस्त करण्याचा घाट घातला आहे. सन १९५८ पासून या जागेवर जिल्हा परिषदेची मालकी असताना आताच पालिकेला जाग का यावी? असा सवाल केला जात आहे.
किनवट : किनवट नगरपरिषदेने निजामकालीन मुलींची कन्याशाळा जमीनदोस्त करण्याचा घाट घातला आहे. सन १९५८ पासून या जागेवर जिल्हा परिषदेची मालकी असताना आताच पालिकेला जाग का यावी? असा सवाल केला जात आहे.
पालिकेने जि.प. कन्या (उर्दू), जि.प. हायस्कूलच्या इमारतीवर हातोडा टाकला होता. आता जि.प. कन्या मुलींची शाळा नेस्तनाबूत करण्याचा इरादा पालिकेच्या संबंधितांचा आहे. इमारतच नसल्याने उर्दू शाळेच्या विद्यार्थिनीची शाळा गोकुंदा येथील जि. प. शाळेमध्ये भरवावी लागत आहे. उर्दू कन्या शाळेत पहिली ते चौथीपर्यंत तर मराठी कन्या शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग चालतात. जि़प़मुलींचे हायस्कूल आठवी ते दहावीपर्यंत इथेच होती़ तालुक्यात जि.प.ची ही पहिली शाळा अस्तित्वात आली आहे. तशी तर स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच ती निजाम राजवटीतही ही शाळा होती. इमारत पाडण्याच्या नावाखाली पालिकेच्या संबंधितांचा वेगळाच इरादा असल्याचा आरोप केला जात आहे.
पालिकेने जि.प. कन्या (उर्दू), जि.प. हायस्कूलच्या इमारतीवर हातोडा टाकला होता. आता जि.प. कन्या मुलींची शाळा नेस्तनाबूत करण्याचा इरादा पालिकेच्या संबंधितांचा आहे. इमारतच नसल्याने उर्दू शाळेच्या विद्यार्थिनीची शाळा गोकुंदा येथील जि.प. शाळेमध्ये भरवावी लागत आहे.
जिल्हा परिषदेच्या दोन इमारती पाडल्यानंतर तिसरी पाडण्याच्या हालचाली सुरु आहेत. यासंदर्भात पालिकेला आपण पत्र देवून सदर इमारत आमची आहे, तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे व शैक्षणिक नुकसान करीत आहेत. जाणूनबुजून इमारत पाडण्याचा प्रयत्न करीत आहात, असे त्यात नमूद केल्याने इमारत पाडण्याची कारवाई तूर्तास थांबली आहे- सुभाष पवणे, गटशिक्षणाधिकारी, किनवट
कन्या शाळेची जागा आमची, असे शिक्षण विभागाचे म्हणणे असले तरीही पालिकेच्या नमुना ४३ वर ती जागा पालिकेच्या मालकीची नोंद दाखविते- एम. जे. लोखंडे, प्रभारी मुख्याधिकारी, किनवट पालिका