लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेड जिल्ह्यातून जाणाऱ्या बुटीबोरी ते तुळजापूर या ३६१ क्रमांकाच्या महामार्गासाठी सध्या भूसंपादनाचे काम सुरु आहे. हे भूसंपादन करताना ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील जमिनीस कमी मावेजा देण्यात येत आहे़ तसेच ग्रामीण भागातील शेतमालकांना शंभर टक्के मावेजा देण्याऐवजी वेगवेगळे टप्पे पाडण्यात आले आहेत. त्यामुळे भूसंपादनाच्या मावेजातील तफावत दूर करुन सरसकट मावेजा देण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी केली़या तिन्ही शहरांतील जमीन किंवा प्लॉटचे भाव ग्रामीण भागापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत. परंतु मावेजा कमी मिळत आहे. जमीनमालकास सद्य:स्थितीतील बाजारभावाप्रमाणे जास्तीचा भाव मिळणे आवश्यक आहे. २०१६ च्या बाजारमूल्य तक्त्यातील त्रुटी दूर करुन अधार्पूर, हदगाव व लोहा शहरातील जमीन आणि प्लॉटमालकास रास्त मावेजा देण्यात यावा.शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील शेतक-यांची जमीन संपादित करताना मोबदला निश्चितीमध्ये मार्गदर्शक सूचना क्रमांक २९ (ब) चा अंमल केला जातो.यामुळे जमीनमालकास शंभर टक्के मोबदला न मिळता सुरुवातीच्या ५०० चौरस मीटर क्षेत्राकरिता शंभर टक्के, ५०१ ते १५०० पर्यंत ७० टक्के, १५०१ ते २५०० चौ.मी.पर्यंत ४० टक्के, २५०१ ते ४ हजार चौ.मी. पर्यंत ३० टक्के व त्यानंतर प्रतिेहेक्टरी दर निश्चित करण्यात आला आहे.त्यामुळे शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील जमीनमालकावर सद्धा मोठा अन्याय होत आहे. मार्गदर्शक सूचना क्र. २९ (ब) व मार्गदर्शक सूचना क्र.१६ (ब) यामुळे भूसंपादन क्षेत्रास सरसकट मावेजा मिळत नाही.त्यामुळे यातील त्रुटी दूर करुन शहरी भागासाठी १ ऐवजी २ गुणक मंजूर करावा तसेच ग्रामीण भागातील सर्व संपादित केलेल्या जमिनीसाठी सरसकट शंभर टक्के मावेजा देण्याचे आदेश द्यावेत असे निवेदनात नमूद आहे़ग्रामीण भागापेक्षा कमी मोबदला- खा. चव्हाण४३६१ या राष्ट्रीय महामार्गावर नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, हदगाव व लोहा ही तीन शहरे येत आहेत. यासाठी लागणाºया जमिनीचे संपादन करताना बाजारमूल्य तक्त्यानुसार त्यांना १ गुणक देण्यात आला. २०१६ च्या बाजारमूल्य तक्त्यातील त्रुटीमुळे शहरी भागास १ गुणक तर ग्रामीण भागात २ गुणक मंजूर करण्यात येत असल्यामुळे या तिन्ही शहरांतील जमीनधारकांना ग्रामीण भागापेक्षा कमीच मोबदला मिळत आहे- अशोकराव चव्हाण, खासदार तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
महामार्ग भूसंपादनाचा सरसकट मावेजा द्या : अशोकराव चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:57 AM