ध्येयवेड्या शिक्षकांमुळे वरवट जि़प़ शाळेला चांगले दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:40 AM2019-06-23T00:40:56+5:302019-06-23T00:43:25+5:30

एकाच वर्षी नवोदय विद्यालयात या शाळेचे २५ विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले. यावरुन शाळेची गुणवत्ता लक्षात यावी. जिल्हा परिषद शाळेचे रुपडे दिवसेंदिवस बदलत आहे. खाजगी शाळा, इंग्रजी शाळांचे वेड आता कमी होत चालले आहे. शाळेच्या नावावर अमाप पैसा पालकांकडून लुटणाऱ्या शाळांच्या निकालाची टक्केवारी घसरली आहे.

Good day to school, due to goal-seekers teacher | ध्येयवेड्या शिक्षकांमुळे वरवट जि़प़ शाळेला चांगले दिवस

ध्येयवेड्या शिक्षकांमुळे वरवट जि़प़ शाळेला चांगले दिवस

Next
ठळक मुद्देविद्यार्थीसंख्या वाढलीजिल्हास्तरीय स्काऊट मेळाव्यात विद्यार्थ्यांची कामगिरी

सुनील चौरे।
हदगाव : एकाच वर्षी नवोदय विद्यालयात या शाळेचे २५ विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले. यावरुन शाळेची गुणवत्ता लक्षात यावी. जिल्हा परिषद शाळेचे रुपडे दिवसेंदिवस बदलत आहे. खाजगी शाळा, इंग्रजी शाळांचे वेड आता कमी होत चालले आहे. शाळेच्या नावावर अमाप पैसा पालकांकडून लुटणाऱ्या शाळांच्या निकालाची टक्केवारी घसरली आहे. प्राथमिक शिक्षण बोलीभाषेतूनच द्यावे, असे शिक्षणतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ज्ञांचे मत असल्यामुळे पालकांचा कल बदलला आहे.
जिल्हा परिषद शाळांना काही ध्येयवेड्या शिक्षकांमुळे चांगले दिवस आले आहेत. वेगवेगळे प्रयोग शाळेत करुन घटलेली विद्यार्थीसंख्या वाढविली. गुणवत्ता वाढविली. अशीच मनाठा केंद्रातील वरवट या छोट्याशा गावातील जिल्हा परिषद शाळा. आज प्रयोगशील शाळा म्हणून तालुक्यात नावारुपाला आली आहे.
जानेवारीमध्ये जिल्हास्तरीय स्काऊट मेळावा हदगावमध्ये झाला. यामध्ये या शाळेच्या विद्यार्थ्याने चार पारितोषिक मिळविले. ज्ञानरचनाकार, सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक व सामाजिक उपक्रम शाळेत वर्षभर राबविले जातात. फेसबूकवर या वरवटची शाळा म्हणून अकाऊंट सुरु करण्यात आले आहे. येथे शाळेच्या उपक्रमाची माहिती व फोटो अपलोड केले जातात. तत्कालीन जिल्हाधिकारी परदेशी यांच्या प्रयत्नातून शिष्यवृत्तीचा पॅटर्न राबविण्यात आला़ त्यावेळी शाळेने त्यामध्ये उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला़ त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षकांना स्वत:च्या स्वाक्षरीनिशी अभिनंदनपत्रे पाठविली होती. यामुळे शिक्षकांचा हुरुपही वाढला होता.
ध्यास शिष्यवृत्तीचा पॅटर्न राबविला
२०१३-१४ मध्ये ध्यास शिष्यवृत्तीचा हा पॅटर्न राबविला होता. त्यासाठी जिल्ह्यातून उपक्रमशील शिक्षकांची निवड करण्यात आली होती. यामध्ये वरवटच्या शाळेतील शिक्षक जयस्वाल यांची निवड झाली होती. जिल्ह्यातील टॉपच्या शिक्षकांनी तालुक्याच्या ठिकाणी जावून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले होते.
शाळेचे मुख्याध्यापक म्हणून शाळेचे रुपडे बदलण्यासाठी शिक्षकांची मेहनत आहे़ त्याचप्रमाणे विद्यार्थी व पालकांचेही सहकार्य आहे़ त्यांना दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करतात़ मेहनत व जिद्दीमुळे आज आमची शाळा उपक्रमशील शाळा म्हणून नावारुपाला आली आहे़ - खंडू जोशी

Web Title: Good day to school, due to goal-seekers teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.