हदगाव बातमीतील कोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:32 AM2021-03-13T04:32:18+5:302021-03-13T04:32:18+5:30

३) माझी कोण धास्ती घेत आहे, मला माहीत नाही. जनताच ठरवेल, कोणाला आमदार करायचं, माझे पॅनल हदगाव-हिमायतनगर नगर परिषद ...

Hadgaon news quote | हदगाव बातमीतील कोट

हदगाव बातमीतील कोट

googlenewsNext

३) माझी कोण धास्ती घेत आहे, मला माहीत नाही. जनताच ठरवेल, कोणाला आमदार करायचं, माझे पॅनल हदगाव-हिमायतनगर नगर परिषद निवडणूक लढवणारच आहे -बाबुराव कदम कोहळीकर, माजी जिल्हाप्रमुख शिवसेना.

शिवजयंती साजरी

कुंटूर - मौजे बळेगाव येथे १० मार्च रोजी शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष आनंद शिंदे, उपाध्यक्ष मारोती बेलकर, सरपंच गंगाधर बेलकर, माधव नारसनवाड, सुरेश बेलकर, भास्कर बेलकर, प्रभाकर बेलकर, संतोष बेलकर, संतोष बेलकर, आनंदा बेलकर आदी उपस्थित होते.

महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची गरज

बोधडी - येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. महिला डॉक्टरांअभावी उपचारासाठी किनवटला जावे लागते. त्यामुळेही अनेक अडचणी येत आहेत. बोधडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १४ उपकेंद्र कार्यान्वित असून ३० ते ४०गावातील नागरिक उपचारासाठी येतात.

महिला दिन साजरा

बोधडी - येथील वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा गौरव व सत्कार सोळहा पार पडला. कार्यक्रमाला सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तीकुमार पुजार, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक, सहाय्यक वनरक्षक दत्तात्रय पवार, वनपरीक्षेत्र अधिकारी माधव केंद्रे, हराळ, श्रीकांत जाधव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी उपवनसंरक्षक सातेलीकर यांनी मार्गदर्शन केले.

वृक्ष लागवडीची माहिती द्या

हदगाव - तालुक्यातील मौजे भाटेगाव येथे तीन वर्षापूर्वी सामाजिक वनीकरण विभागाकडून झालेल्या वृक्ष लागवड व त्यावरील खर्चाची माहिती देण्यात यावी, अशी मागणी सुदर्शन शिंदे यांनी केली. वृक्ष लागवडीनंतर अनेक वृक्ष अस्तित्वात राहिले नाहीत. उर्वरित वृक्षाभोवती काटेरी झाडेझुडूपे वाढली असा आरोप शिंदे यांनी करून किती वृक्ष लागवड करण्यात आली होती, खर्च किती झाला, कोणकोणत्या कामावर झाला, त्याची माहिती द्यावी, अशी मागणीही शिंदे यांनी केली.

निधन वार्ता

देवनबाई माचापुरे यांचे निधन

सगरोळी - येथील देवनबाई दिगंबर माचापुरे (वय ४५) यांचे दीर्घ आजाराने १० मार्च रोजी पहाटे राहत्या घरी निधन झाले. सायंकाळी ५ वाजता साठेनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. टायगर ग्रुपचे तालुकाध्यक्ष नागेश माचापुरे यांच्या त्या आई होत.

Web Title: Hadgaon news quote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.