जाकापूर, इस्लापूरला भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:42 AM2019-03-24T00:42:32+5:302019-03-24T00:43:46+5:30

तालुक्यात कमी झालेले पर्जन्यमान आणि पुरेशा सिंचन क्षमतेच्या अभावामुळे फेब्रुवारी पासून पाणी टंचाईच्या झळा तालुकावासियांना सोसाव्या लागत आहेत.

Hazardous water shortage in Jalpaipur and Islapur | जाकापूर, इस्लापूरला भीषण पाणीटंचाई

जाकापूर, इस्लापूरला भीषण पाणीटंचाई

Next
ठळक मुद्देभोकर तालुक्यात १४ गावांत अधिग्रहणइस्लापूरला महिलांनी खुर्चीला चिटकवले निवेदन

भोकर : तालुक्यात कमी झालेले पर्जन्यमान आणि पुरेशा सिंचन क्षमतेच्या अभावामुळे फेब्रुवारी पासून पाणी टंचाईच्या झळा तालुकावासियांना सोसाव्या लागत आहेत. आतापर्यंत ४३ गावांनी अधिग्रहणाची मागणी केली असली तरी १४ गावांमध्ये अधिग्रहण मंजूर करण्यात आले आहे. तर जाकापूर येथे टँकरची मागणी करण्यात आली आहे.
तालुक्याचा सर्वाधिक भाग डोंगराळ असल्याने कायम पाण्याच्या स्तोत्राचा अभाव आहे. त्यातच पुरेशा साठवण क्षमतेची कमतरता असल्याने जानेवारी अखेर तालुक्याला पाणी टंचाईचा सामना अधिकतर गावांना करावा लागतो. याहीवर्षी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यातील १७ गावांनी जानेवारी अखेर पंचायत समितीकडे अधिग्रहणाची मागणी केली होती. त्या प्रमाणे पंचायत समिती व तहसील कार्यालयामार्फत स्थळ पाहणी केलेल्या ६ गावातील टंचाई निवारणार्थ खाजगी विहीर अथवा विंधन विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे. यात पोमनाळा, कासारपेठ तांडा, गारगोटवाडी (पां), कोळगाव (खु), डौरवाडी, कांडली आदी गावांना फेब्रुवारी महिन्यातच अधिग्रहणाला मंजुरी मिळाली. त्यानंतर फेब्रुवारी अखेर पर्यंत अधिग्रहण मागणीच्या प्रस्तावानुसार मंजूर करण्यात आलेल्या ८ गावांना मंजुरी मिळाली आहे. यात पाकी धुळदेव, चिंचाळा, गारगोटवाडी (दि.), पाकीतांडा, पांडूरणा, देवठाणातांडा, देवठाणामसलगा आणि देवठाणा आदी गावात नव्याने मंजुरी मिळाली आहे. मागणी केलेल्या रामनगरतांडा, देवठाणातांडा आणि दिवशी खु. तांडा येथील मागणी नामंजूर करण्यात आली तर उर्वरीत २६ गावांमध्ये पंचायत समिती स्तरावर स्थळ पाहणी करण्यात येवून तहसील कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
शहरापासून ६ कि.मी. वरील जाकापूर येथे ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून येथील ग्राम पंचायतीने टँकर मागणीचा ठराव घेवून तसा प्रस्ताव एक महिन्यापूर्वीच सादर केला असला तरी तेथे अजून मंजुरी मिळाली नसल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे.
अधिग्रहण मागणीला मंजुरी
पोमनाळा, कासारपेठ तांडा, गारगोटवाडी (पां), कोळगाव (खू), डौरवाडी, कांडली आदी गावांना फेब्रुवारी महिन्यातच अधिग्रहणाला मंजुरी मिळाली. त्यानंतर फेब्रुवारी अखेर पर्यंत अधिग्रहण मागणीच्या प्रस्तावानुसार मंजूर करण्यात आलेल्या ८ गावांना मंजुरी मिळाली आहे. यात पाकी धुळदेव, चिंचाळा, गारगोटवाडी (दि.), पाकीतांडा, पांडूरणा, देवठाणातांडा, देवठाणामसलगा आणि देवठाणा आदी गावात नव्याने मंजुरी मिळाली आहे.
दहा दिवसांपासून नळयोजना बंद
इस्लापूर : परिसरातील नागरिकांना सध्या तीव्र पाणीटंचाईची झळ सहन करावी लागत आहे़ मागील दहा दिवसापासून नळ योजना बंद असल्याने महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयातील खुर्चीलाच निवेदन चिटकावले़ पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महिला निवेदन देण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये गेल्या होत्या़ मात्र त्याठिकाणी सरपंचासह पदाधिकारी न आल्याने महिलांनी चक्क खुर्चीलाच निवेदन चिटकविले. २६ मार्च रोजी पाणी पुरवठा न केल्यास ग्रा.पं.ला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. सध्या येथे शंभर रुपये टाकीप्रमाणे पाणी विक्री चालू आहे. काही गावकरी वॉटर फिल्टरचे अशुद्ध वेस्ट पाणी वापरत आहेत. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी निवेदन दिले़ यावेळी रंजना बर्डे, अखिला शेख, करुणा शेळके, कलावती हनवते, पदमीनबाई घुले, पंचफुला मोरे, सत्यभामा पंदीलवार, सौजरबाई पंदिलवार, गंगाबाई काळे, पद्मीन गजभारे, रजिया शेख, खादीरबाई श्ेख, चंद्रकला भवरे, दुर्गा वाघमारे, आखिलाबी, आम्रपाली शेळके, सुरेखा जाधव, किरण वानखेडे, प्रतिभा हनवते, लव्हाळेबाई, शेख हुसेन, दलित भालेराव, रफीक पटेल, रवि कसबे, संतराम पंदीलवाड आदी उपस्थित होत्या़

Web Title: Hazardous water shortage in Jalpaipur and Islapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.