नांदेड : जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू असून आणखी पाच दिवस ही लाट कायम राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने कळविले आहे़ मागील आठवडाभरापासून नांदेडचा पारा ४४ अंशावर राहत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत़ सोमवारी नांदेडचे तापमान ४४ अंश सेल्सिअस नोंदल्या गेले़यंदाच्या उन्हाळ्यातील मे महिना हा सर्वाधिक उष्ण राहिला़ मे महिन्यात नांदेडचे तापमान ४५ अंशापर्यंत गेले होते़ मागील पंधरा दिवसांपासून नांदेडचे तापमान ४४ अंशावरच राहिले आहे़ त्यामुळे नागरिक होरपळून निघाले आहेत़ उन्हामुळे नागरिकांना तापाचे आजार होत असून शासकीय व खाजगी रूग्णालयांमध्ये रूग्ण उपचारासाठी गर्दी करत आहेत़ दरम्यान, हवामान विभागाने आणखी चार ते पाच दिवस तीव्र उष्णतेची लाट राहणार असल्याचे सांगितले आहे़ त्यामुळे नागरिकांनी डोक्याला रूमाल बांधून व गॉगल लावूनच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे़जिल्ह्यात दुष्काळ गंभीर बनला आहे़ शहरासह सर्वच तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ शासनाच्या वतीने उपाययोजना केवळ कागदावरच राबविल्या जात असल्याचे चित्र आहे़ नांदेड शहरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे़ शहरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ मात्र तो अपुरा पडत आहे़ नळाला दर चार दिवसांनी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे़ अनेकांच्या बोअरचे पाणी आटले आहे़ त्यामुळे नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ग्रामीण भागातही पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ टँकरने पाणीपुरवठा होत असलेल्या ठिकाणी पाण्यासाठी उन्हात रांगा लागत आहेत़ त्यामुळे ऊन लागत असल्याच्या घटना वाढल्या आहेत़३१ मे पर्यंत राहणार ४५ अंश सेल्सिअस तापमानजिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान २५ मे रोजी ४५ अंश सेल्सिअस नोंदल्या गेले, अशी माहिती हवामान निरिक्षक बालासाहेब कच्छवे यांनी दिली़ पुढील तीन दिवस तापमान ४४ अंशावर राहणार आहे़ २६ मे रोजी किमान २९ अंश तर कमाल तापमान ४४ अंश नोंदल्या गेले़ २७ व २८ मे रोजी किमान २९ अंश तर कमाल तापमान ४४ अंश राहणार आहे़२९ मे रोजी किमान ३० तर कमाल ४५ अंश सेल्सिअस, ३० व ३१ मे रोजी कमाल ४५ अंश सेल्सिअस तापमान राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे़ त्यामुळे नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे़ उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये़ तसेच उन्हात जाताना डोक्याला रूमाल व चष्मा घालणे आवश्यक आहे़
नांदेड जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:16 AM
जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू असून आणखी पाच दिवस ही लाट कायम राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने कळविले आहे़ मागील आठवडाभरापासून नांदेडचा पारा ४४ अंशावर राहत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत़ सोमवारी नांदेडचे तापमान ४४ अंश सेल्सिअस नोंदल्या गेले़
ठळक मुद्देशहरात रस्त्यांवर शुकशुकाटवाढते तापमान, वातावरणामुळे रूग्णांच्या संख्येत वाढ