किती ही लूट? इतवारात कांदा १५ रुपये, तर घराजवळ ३० रूपये किलो !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:19 AM2021-07-30T04:19:11+5:302021-07-30T04:19:11+5:30
कांद्याचे भाव हे सर्वसामान्यांना कधी-कधी रडवणारे ठरतात. तीन महिन्यापूर्वी कांदा हा ८० रुपये किलो दरापर्यंत पोहचला होता. परंतु कांद्याची ...
कांद्याचे भाव हे सर्वसामान्यांना कधी-कधी रडवणारे ठरतात. तीन महिन्यापूर्वी कांदा हा ८० रुपये किलो दरापर्यंत पोहचला होता. परंतु कांद्याची आवक वाढल्याने भाव पुन्हा घसरले. इतवारा बाजारपेठेत कांदा १५ ते २० रुपये किलो दराने मिळत आहे. पण तोच कांदा भाजीपाला विक्रेते ३० रुपये किलोप्रमाणे दारावर विकत आहेत. आठवडी बाजारात कांद्याचे दर २० ते २५ किलो असे आहेत. यातून व्यापाऱ्यांची नफेखोरी स्पष्ट होते. सामान्यांच्या होणाऱ्या या लुटीवर यावर कोणाचेही नियंत्रण नाही.
पिकवतात शेतकरी, जास्तीचा पैसा तिसऱ्याच्याच हातात !
जिल्ह्यात भाजीपाल्याची सर्वात मोठी बाजारपेठ इतवारा बाजार आहे. या ठिकाणी होणाऱ्या बिटाद्वारे भाव ठरतात.
व्यापारी शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा खरेदी करतात आणि तो किरकोळ विक्रेत्यांकडे सोपवतात. या प्रक्रियेत व्यापारी आपला नफा काढून घेतो.
शेतकऱ्यांकडून व्यापारी, व्यापाऱ्यांकडून किरकोळ विक्रेते आणि ग्राहक अशी साखळी असते. किरकोळ व्यापारी दारावर भाजीपाला विक्री करतात. तेही आपली मजुरी काढतात.