किनवट (जि़नांदेड) : वनपरिक्षेत्र किनवट अंतर्गत येणाऱ्या कमठाला शिवारात बिबट्याने धुमाकूळ माजवला आहे़ मागील तीन आठवड्यात बिबट्याने तीन वासरांचा फडशा पाडला़ यामुळे घोटी कमठाला शिवारातील पशुपालक शेतकरी भयभीत झाला आहे़ वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे़
कमठाला घोटी शिवारात बिबट्याचा मुक्त संचार असल्याने पशु पालक चिंतीत आहेत़ कमठाला येथील शेतकरी अनुरथ सुर्यवंशी यांच्या शेत शिवारात दीड वर्षाच्या वासराचा बिबट्याने ८ जुलै रोजी गळा घोटला़ तर ११ जून रोजी आणखी एका वासराचा फडशा पाडला़ वासरे मारण्याच्या घटना घडत असल्याने गायी दूध देत नसल्याचे पशु पालकांचे म्हणणे आहे़ दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी के़एनक़ंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल के़जीग़ायकवाड, सांगळे, वनरक्षक दुर्गा डाळके, वनमजुर मौला, कबीर यांनी पंचनामा केला़ बिबट्याचा बंदोबस्त न केल्यास शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत़