सक्तीची वीज बिल वसुली
नायगाव : थकीत वीज बिल वसुलीसाठी वीज विरतण कंपनीने वसुली मोहीम सुरू केल्याने वीज ग्राहक घाबरले आहेत. राज्य शासनाने मधल्या काळात वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तसे काही न झाल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. काहीतरी माफी मिळेल, अशी अपेक्षा ग्राहकांची होती.
क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
देगलूर : शहापूर येथील आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन २३ रोजी आ. रावसाहेब अंतापूरकर यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत ४० जणांनी सहभाग नोंदवला. प्रथम बक्षीस ५१ हजार तर द्वितीय २१ हजार रुपये आहे. तृतीय बक्षीस ११ हजार रुपये ठेवण्यात आले. यावेळी जि.प.चे माजी सभापती माधवराव मिसाळ, पं.स. उपसभापती जगदीश चिंतलवार, मलकारेड्डी येलावार, विलासरेड्डी आदी उपस्थित होते.
ठाकरे यांची जयंती
लोहा : शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती माजी आ. रोहिदास चव्हाण यांच्या निवासस्थानी साजरी करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्षा आशा चव्हाण, नवनाथ चव्हाण, शेषराव कहाळेकर, नगरसेवक संभाजी चव्हाण, भुराजी पाटील, गोविंद चव्हाण, रामकिशन पारेकर, बाबाराव पाटील, परसराम वडजे आदी उपस्थित होते.
निधी संकलन सुरू
हदगाव : राम मंदिर उभारणीच्या कामासाठी निवघा बाजार येथे निधी संकलनाचे काम सुरू झाले. यावेळी डॉ. विनोदकुमार अग्रवाल, सुशील मावडे, जगदीश तावडे, नंदकुमार माटाळकर, मधुकर कदम, राम कदम, मनोज कदम, धनंजय कदम, भास्कर कदम, लक्ष्मण महाराज आदी उपस्थित होते.
विवाहितेचा छळ
माहूर : दुचाकी घेण्यासाठी माहेराहून २ लाख रुपये घेऊन ये असे म्हणून विवाहितेचा छळ करणाऱ्या आरोपींविरुद्ध सिंदखेड पोलिसांनी गुन्हा नोंदविला. जून २०२० पासून छळ सुरू होता असे विवाहितेने फिर्यादीत नमूद केले. सिंदखेड पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.
अनोळखी मृतदेह
फुलवळ : फुलवळ शहरातील दत्तटेकडी परिसरात शनिवारी ३७ वर्षीय अनोळखी इसमाचे सडलेले प्रेत सापडले. उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, सपोनि संग्राम जाधव आदींनी घटनास्थळी भेट दिली. मयत व्यक्ती कैलास टोम्पे (वय ३७, निलंगा, जि. लातूर) येथील रहिवासी असून, व्यवसायाने तो मजूर होता. कंधार पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद घेतली. तपास मधुकर गोंटे करीत आहेत.