यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर, अधिष्ठाता डॉ. दिलीपराव म्हैसेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, प्रदेश कार्यकारिणी सदस्य संतुकराव हंबर्डे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन्य बापू देशमुख, विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, अभियानाचे प्रमुख दिलीप ठाकूर, आदी उपस्थित होते.
मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या नेतृत्वात कम्युनिटी किचनद्वारे गरजूंना अन्न पुरविण्यात आले होते. या वर्षीही कोरोनामुळे अनेक कुटुंबे बाधित झाली असून अनेकांच्या घरचे रुग्ण वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत. अशावेळी त्या रुग्णांच्या सोबत असलेल्या नातेवाइकांना आधार देण्यासाठी, त्यांची पोटाची भूक भागविण्यासाठी भाजपच्या वतीने आधार गरजूंना या उपक्रमाद्वारे दररोज एक हजार जेवणाचे भरलेले डबे पुरविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे, नगरसेवक राजू गोरे, नगरसेवक जनार्दन गुपिले, सिडको मंडळ अध्यक्ष वैजनाथ देशमुख, सुनील मोरे, अमोल ढगे, मनोज जाधव, धीरज स्वामी, राज यादव, कुणाल गजभारे, आनंद दासरवार, अरुणकुमार काबरा, संतोष भारतीय, गजानन कत्ते, उमेश स्वामी, मंगेश कदम, शाहू महाराज, विशाल दगडू, आदींची उपस्थिती होती.