लसीकरणाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:08 AM2021-02-05T06:08:36+5:302021-02-05T06:08:36+5:30
गळफास घेवून आत्महत्या बिलोली - तालुक्यातील सुलतानपूर हद्दीत माळालगत असलेल्या झाडाला एका इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याचीघटना २४ जानेवारी ...
गळफास घेवून आत्महत्या
बिलोली - तालुक्यातील सुलतानपूर हद्दीत माळालगत असलेल्या झाडाला एका इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याचीघटना २४ जानेवारी रोजी उघडकीस आली.चांदू चक्कोजी लाखे (वय ६०) असे मयताचे नाव असून त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला.
नरवाडे यांचा सत्कार
हदगाव - येवली ता.हदगाव ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे तालुका संघटक मुकींदा नरवाडे यांनी विजयाची हॅटट्रीक केली. यानिमित्त माजी तालुका उपाध्यक्ष नागोराव कदम यांनी नरवाडे यांचा सत्कार केला. यावेळी माजी संचालक पंडित पाटील, तातेराव वाकोडे, मदन राठोड उपस्थित होते.
माहूर गडावर गर्दी
माहूर - येथील रेणुकादेवीच्या गडावर दर्शनासाठी भाविक गर्दी करीत आहेत. शनिवार, रविवार, सोमवार वगळता मंगळवारी सलग सुट्या आल्याने गडावर भाविकांची मांदियाळी दिसून आली. २४ जानेवारी रोजी हजारो भाविकांची गर्दी झाली होती. बहुतांश भाविक खाजगी चारचाकी वाहनांनी माहुरात पोहचले होते.
तालुकाध्यक्षपदी नरवाडे
धर्माबाद - युवक कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी हणमंत नरवाडे तर कार्याध्यक्षपदी बंडू पाटील व शहराध्यक्षपदी योगेश जायशेठ यांची नियुक्ती झाली. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या सर्वांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी आ.अमरनाथ राजूरकर, माजी आ.वसंतराव चव्हाण, वर्णी नागभूषण, रवींद्र पाटील, सभापती संजय बेळगे उपस्थित होते.
सचिन सांगळे रूजू
देगलूर - येथील उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून सचिन सांगळे २४ जानेवारी रोजी सायंकाळी रूजू झाले. यापूर्वीचे रमेश सरवदे हे आजारी असल्याने रजेवर आहेत. यापूर्वी सांगळे हे लातूर शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते.
महिलेस शिवीगाळ
मुखेड - मुखेड तालुक्यातील हिप्परगा दे. येथे महिलेला अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना २२ जानेवारी रोजी सकाळी घडली. भारजाबाई कांबळे यांना मारहाण झाली. मुखेड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली. जमादार कामजगे तपास करीत आहेत.
कापसीला कृषी महोत्सव
लोहा - श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर अंतर्गत कृषी शास्त्र विभागाच्या वतीने एकदिवसीय कृषी महोत्सव कापसी गुंफा येथे घेण्यात आले. या महोत्सवासाठी कापसी बु., वाका, वाळकी बु., जोमेगाव, हातणी, येळी, कौडगाव आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.
वाळू उपसा जोरात
लोहा - लोहा तालुक्यातील तथा गोदाकाठावरील अंतेश्वर, पेनूर, शिराेडी, बेटसांगवी, कपिलेश्वर, मोहनपुरा या ठिकाणी अवैध वाळू उपसा जोरात सुरू आहे. पावसाळ्याचे चार महिने वगळता उर्वरित संपूर्ण महिन्यात वाळू उपसा सुरू असतो. प्रशासन अधिकारीही याकडे लक्ष देत नाहीत.
मुंगरे यांना पदोन्नती
लोहा - येथील भूमीपूत्र तथा तालुका उपकोषागार अधिकारी दामोदर मुंगरे यांची वर्ग २ संवर्गातील लेखाधिकारी म्हणून पदोन्नती झाली. त्यांची नियुक्ती लेखाधिकारी जलसंधारण विभाग येथे झाली. या नियुक्तीबद्दल तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी नायब तहसीलदार एस.एम.देवराळे, तिरुपती मुंगरे, सुधाकर सातपुते आदी उपस्थित होते.