सेना पदाधिकाऱ्यांची बैठकीकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:32 AM2019-03-24T00:32:29+5:302019-03-24T00:32:50+5:30

शिवसेनेसोबत उघड बंड पुकारुन भाजपाचे कमळ हाती धरलेल्या प्रताप पाटील चिखलीकर यांना भाजपाने नांदेड लोकसभेची उमेदवारी दिली आहे़ परंतु त्यांच्या उमेदवारीला जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचाच विरोध होत असल्याचे दिसून येत आहे़ शनिवारी आ़सुभाष साबणे यांच्या निवासस्थानी चिखलीकर समर्थनासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती़

Lessons to the meeting of Army officers | सेना पदाधिकाऱ्यांची बैठकीकडे पाठ

सेना पदाधिकाऱ्यांची बैठकीकडे पाठ

Next
ठळक मुद्देचिखलीकर: समर्थनार्थ बोलाविली होती बैठक

नांदेड : शिवसेनेसोबत उघड बंड पुकारुन भाजपाचे कमळ हाती धरलेल्या प्रताप पाटील चिखलीकर यांना भाजपाने नांदेड लोकसभेची उमेदवारी दिली आहे़ परंतु त्यांच्या उमेदवारीला जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचाच विरोध होत असल्याचे दिसून येत आहे़ शनिवारी आ़सुभाष साबणे यांच्या निवासस्थानी चिखलीकर समर्थनासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती़ परंतु या बैठकीला शिवसेनेचे संपर्क प्रमुख धोंडू पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविली़
महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे आ़प्रताप पाटील चिखलीकर यांनी उघड बंडाचा झेंडा फडकावित भाजपाच्या निवडणुक प्रचाराची धुरा सांभाळली होती़ त्यावेळी चिखलीकरांनी भाजपाच्या व्यासपीठावरुन सेनेवर तिखट बाणांचा मारा केला होता़ त्यामुळे घायाळ झालेल्या शिवसैनिकांची ती भळभळती जखम अजूनही भरलीच नाही़
त्यात चिखलीकरांनी मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधत सेनेच्या पदाधिकाºयांना अधिकच डिवचले़ त्यात नांदेड लोकसभेची जागा ही भाजपाकडे आहे़ त्यामुळे भाजपाने या जागी चिखलीकरांना उमेदवारी जाहिर केली़
परंतु ही उमेदवारी जाहिर करण्यापूर्वीच जिल्ह्यातील सेना पदाधिकाºयांनी नांदेडातील उमेदवार ठरविताना आम्हाला विश्वासात घ्या, अन्यथा संबधात ताणले जातील असा इशारा दिला होता़ सेनेच्या एका पदाधिकाºयाने तर नांदेडची जागा सेनेला सोडावी अशी मागणी करीत उमेदवारी अर्जही घेतला होता़ त्यामुळे चिखलीकर यांच्या उमेदवारीनंतर सेना-भाजपात सर्व काही आलबेल आहे असे नव्हते़ त्यात शनिवारी सेनेचे आ़सुभाष साबणे यांच्या निवासस्थानी चिखलीकर यांच्या समर्थनार्थ सेना पदाधिकाºयांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ परंतु या बैठकीला संपर्कप्रमुख, सहसंपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख यासह प्रमुख पदाधिकाºयांनी पाठ फिरविली़
बैठकीचे निमंत्रण परंतु मी वसमतला
याबाबत संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, साबणे यांच्या निवासस्थानी होणाºया बैठकीचे मला निमंत्रण मिळाले होते़ परंतु मी शहिद जवानाच्या अंत्यविधीसाठी वसमतला गेलो होतो़ त्या ठिकाणी मला वेळ लागला़ त्यामुळे मी उपस्थित राहू शकलो नाही़ तर दुसरीकडे त्याच वेळी आ़हेमंत पाटील हे नांदेडला येणार असल्यामुळे इतर पदाधिकारी त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर गेले होते़ त्यामुळे ते जावू शकले नसतील असे ते म्हणाले़
भाजपाचे एकला चलो रे
लोकसभेसाठी आ़प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर सेना पदाधिकाºयांकडून अघोषित विरोध सुरु झाला आहे़ त्यात गेल्या दोन दिवसांपासून पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हे जिल्हाभरात बैठका घेत असताना आतापर्यंत भाजप आणि सेनेच्या पदाधिकाºयांची संयुक्त एकही बैठक झाली नाही़ लोणीकर हे प्रारंभी भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करु इच्छित असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यानंतरच ते आपला मोर्चा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेकडे वळवतील, असे दिसत आहे.

Web Title: Lessons to the meeting of Army officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.