हा निराशेचा ठाव गळून पडो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:17 AM2021-05-23T04:17:12+5:302021-05-23T04:17:12+5:30

जिल्हा माहिती कार्यालय नांदेडच्यावतीने सकारात्मकता वाढावी या उद्देशाने सुरु केलेल्या अभियानासाठी त्यांनी आपली भूमिका ठेवली. आजचा भवताल कोरोनामुळे एका ...

Let go of this frustration | हा निराशेचा ठाव गळून पडो

हा निराशेचा ठाव गळून पडो

Next

जिल्हा माहिती कार्यालय नांदेडच्यावतीने सकारात्मकता वाढावी या उद्देशाने सुरु केलेल्या अभियानासाठी त्यांनी आपली भूमिका ठेवली.

आजचा भवताल कोरोनामुळे एका नैराश्येच्या तावडीत सापडला आहे. कोरोना सारख्या आजारांनी गरीब-श्रीमंताची दरी केंव्हाच गळून पडली आहे. जिथे निष्काळजी झाली तिथे हा आजार शहराच्या, गावांच्या सिमा ओलांडून दूर्गम भागातही पोहचला आहे. अनेक लोकांचे आर्थिक चक्र बिघडून गेले आहे. मुलांच्या शाळा ऑनलाईन झाल्याने त्यांचेही वेळापत्रक आणि मानसिकता प्रचंड आव्हानात्मक स्थितीतून जात असेल यात शंका नाही.

कितीही आव्हाने आली तरी आजवर प्रत्येक पिढ्यातील लोकांनी मार्ग हा काढलाच आहे. मग यात प्लेग असो अथवा देवीची साथ. काखेत गाठ आली की, त्याचा जगायचा प्रश्नच नव्हता. त्याकाळी आजच्या एवढ्या ना प्रगत तपासण्या होत्या ना प्रगत इलाज होते. असंख्यांनी आपले गणगोत आपल्या डोळ्यासमोर गमावले. परंतू यातूनही माणसे सावरलीच. कालांतराने विज्ञानाच्या प्रगतीमुळे यावर तात्काळ लस विकसीत झाली. यातूनच मानवी समाजाला प्लेगच्या गंभीर आजारातून मुक्ती मिळाली. कोरोना आजही याच वळणावर आहे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नातून लस विकसित झाली. टप्प्या-टप्प्याने तिचे डोस सर्वत्र उपलब्ध होतील. यातूनही मानवी समाज सावरेल यात शंका नाही. भवताल कितीही आव्हानात्मक असू द्यात, पण वेळेवर उपचार घ्या. विलगीकरणात स्वत:ला ठेवा. हा आजारही लवकर संपेल यात शंका नाही, अशा शब्दात देशमुख यांनी कोरोनाग्रस्तांना दिलासा दिला.

Web Title: Let go of this frustration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.