माहूरच्या रोपवेचा प्रश्न महिनाभरात मार्गी लागणार; नितीन गडकरी यांची शिष्टमंडळाला ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 04:01 PM2017-11-22T16:01:53+5:302017-11-22T16:03:40+5:30

प्रस्तावित असलेल्या  रोपवेचा प्रश्न येत्या महिनाभरात मार्गी लावण्यात येईल अशी ग्वाही केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी श्री रेणुका देवीच्या विश्वस्तांना नागपूर येथे दिली.

Mahur Ropeway questions will be completed in a month;Nitin Gadkari gives words to delegation | माहूरच्या रोपवेचा प्रश्न महिनाभरात मार्गी लागणार; नितीन गडकरी यांची शिष्टमंडळाला ग्वाही

माहूरच्या रोपवेचा प्रश्न महिनाभरात मार्गी लागणार; नितीन गडकरी यांची शिष्टमंडळाला ग्वाही

googlenewsNext
ठळक मुद्देश्री रेणुका देवी संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी विश्वस्त आशिष जोशी यांच्यासह शिष्टमंडळाने गडकरी यांची नागपूर येथील निवासस्थानी भेट घेतली़ माहूर तीर्थक्षेत्र विकासाच्या सुधारित २१६ कोटी रुपयांचा आराखडा तयार आहे़ त्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरीही दिली आहे़

श्रीक्षेत्र माहूर (नांदेड ) : महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावर दर्शनासाठी आलेल्या भक्तांना लवकरच रोप-वेवरून जाण्याचा योग येणार आहे. या तीर्थक्षेत्रासाठी प्रस्तावित असलेल्या  रोपवेचा प्रश्न येत्या महिनाभरात मार्गी लावण्यात येईल अशी ग्वाही केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी श्री रेणुका देवीच्या विश्वस्तांना नागपूर येथे दिली.

माहूर तीर्थक्षेत्राच्या विविध मागण्या तसेच प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्यात यावेत, यासाठी श्री रेणुका देवी संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी विश्वस्त आशिष जोशी यांच्यासह शिष्टमंडळाने गडकरी यांची नागपूर येथील निवासस्थानी भेट घेतली़ माहूर तीर्थक्षेत्र विकासाच्या सुधारित २१६ कोटी रुपयांचा आराखडा तयार आहे़ त्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरीही दिली आहे़ पहिल्या टप्प्यात ६८ कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत़ यात श्री दत्त शिखर, अनुसया माता, रस्ता, श्री दत्त शिखर पायथा ते मंदिर रस्ता, श्री रेणुका देवी मंदिर, श्री अनुसया माता मंदिर, श्री दत्तशिखर मंदिर, सोनपीर बाबा दर्गा, श्री देवदेवेश्वर मंदिर परिसराचा विकास, श्री रेणुकादेवी परिसरातील दोन हेक्टर ६२ आर जागेला संरक्षक भिंत, सभामंडप, स्वच्छतागृह, पाय-या, प्रशासकीय कार्यालय आदी कामांचा समावेश आहे.

पहिल्या टप्प्यातील ६८ कोटींपैकी आजवर केवळ २ कोटी निधी प्राप्त झाला आहे़ सर्व अंदाजपत्रक मंजुरीसाठी मंत्रालयात पाठविण्यात आले आहेत़ अंदाजपत्रकास मंजुरी देवून तत्काळ निधी द्यावा, अशी मागणी या शिष्टमंडळाने गडकरी यांच्याकडे केली़ तसेच भाविकांचा वाढता ओघ पाहता रोप-वेचे कामही तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी करण्यात आली़  यावर रोप-वेचा प्रश्न महिनाभरात मार्गी लावू, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली़ तीर्थक्षेत्र विकासकामांना निधी देण्याबाबतची सूचना राज्य शासनाला करणार असल्याचेही त्यांनी विश्वस्तांना सांगितले.

मुख्य दर्शनद्वार लवकरच होणार मोठे
श्री रेणुका देवीचे मंदिर पुरातन आहे़ मंदिराचे काम करताना राज्य पुरातत्व विभागाची परवानगी घ्यावी लागते़ भाविकांना श्री रेणुका देवीचे दर्शन चांगल्या प्रकारे घेण्यासाठी देवीच्या गाभा-याचे मुख्य दर्शन द्वार मोठे करण्याची आवश्यकता आहे़ तसे संस्थानने पुरातत्व विभागाला कळविले होते़ पुरातत्व विभागाने त्यांच्या यंत्रणेमार्फत काम करण्यात येईल व अंदाज पत्रकाप्रमाणे १ कोटी २७ लाख रुपये संस्थानने पुरातत्व विभागाकडे वर्ग करावेत असे कळविले होते़ या विषयावरही यावेळी चर्चा झाली़ दर्शन द्वारासाठी सांस्कृतिक मंत्रालय १ कोटी २७ लाख रुपये लवकरच पर्यटन मंत्रालयाकडे वर्ग करणार आहे़ त्यामुळे दर्शन द्वार मोठे करण्याची कार्यवाहीही लवकरच होईल, अशी माहिती विश्वस्त चंद्रकांत भोपी यांनी दिली.

Web Title: Mahur Ropeway questions will be completed in a month;Nitin Gadkari gives words to delegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nandedनांदेड