यंदाच्या पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे आहेत. यामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आ. वसंतराव चव्हाण, आराेग्य - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, प्रशासकीय - नांदेड जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, सामाजिक - प्रा. बालाजी कोंपलवार, सुभाष कन्नावार, साहित्यिक - देविदास फुलारी, शिक्षण व साहित्य - प्रा. मधुकरराव राहेगावकर, आदर्श मुख्याध्यापक - गंगाराम रुमाले, पत्रकारिता - नानकसाई फाउंडेशनचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे, कलाक्षेत्र - व्यंकटराव पाटील बेटमोगरेकर, विशेष पुरस्कार - मुंबई दूरदर्शनचे वृत्तसंपादक नरेंद्र विस्पुते, स्वच्छता अभियान - मिलिंद व्यवहारे यांचा समावेश आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर तर आ. मोहनराव हंबर्डे, आ. बालाजी कल्याणकर, आ. श्यामसुंदर शिंदे, गोदावरी अर्बनच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, माजी सभापती भगवानराव आलेगावकर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
वैद्यकीय सहकारी संस्थेचे पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 4:22 AM