नांदेड: जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या बैठकीत नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. याबाबत काँग्रेस आमदार व समिती सदस्य विचारणा करण्यासाठी पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडे गेले असता, बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रूपांतरनंतर धक्काबुकीत झाले.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निधी वाटपावरून कॉंग्रेस -सेना सदस्य आमने सामने. बैठकीनंतर हा वाद आणखी वाढला आणि सेना - काँग्रेसच्या आमदारांमध्ये धक्का बुक्की झाली. पालकमंत्री रामदास कदम यांच्या समोर काँग्रेस आमदार अमरनाथ राजूरकर आणि सेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्यात धक्का बुक्की झाली.
काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अमरनाथ राजूरकर व पालकमंत्री कदम यांच्यात प्रारंभी शाब्दिक वादावादी झाली, त्यानंतर काँग्रेस व शिवसेना आमदार तसेच कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. यावेळी दोन्ही बाजूनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वादविवादानंतर रामदास कदम व आ. राजूकर याची बंद खोलीमध्ये चर्चा झाल्यानंतर सर्व जण निघून गेले. पालकमंत्री नियोजन समिती सदस्यांच्या हक्कावर गदा आणत असल्याचा आरोप यावेळी कॉंग्रेसने केला.