शिवराज बिचेवार।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: बीड जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या पथकाने नांदेड जिल्ह्यात केलेल्या गोदामांच्या तपासणीत धान्य उचल, अभिलेख पडताळणीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असल्याचे उघडकीस आले आहे़ किनवट, भोकर, हिमायतनगर, अर्धापूर, उमरी, नायगाव व मुदखेड तालुक्यात लाभार्थ्यांचा आकडा फुगवून दाखविण्यात आला तर कुठे द्वारपोच धान्यालाही फाटा देण्यात आला़ विशेष म्हणजे, याबाबत नांदेड जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी तीन वेळेस अहवाल सादर करण्याचे आदेश देवूनही संबंधित तहसीलदारांनी त्यालाही केराची टोपली दाखविली़बीडच्या या पथकाने १८ एप्रिल २०१७ रोजी नांदेड दौºयावर आले होते़ यावेळी किनवट, इस्लापूर, मांडवी यासह भोकर, हिमायतनगर, अर्धापूर, उमरी, नायगाव व मुदखेड तालुक्यांतील गोदामांची तपासणी केली़ या तपासणीत अनेक आश्चर्यकारक बाबी समोर आल्या़ त्यात किनवट तालुक्यात एपीएल (शेतकरी) योजनेच्या अभिलेख पडताळणीत गोदामनिहाय जोडण्यात आलेले धान्य दुकानदार, त्यांना जोडण्यात आलेली कार्डसंख्या, लोकसंख्या व देय धान्य नियतन याप्रमाणे धान्य वितरण आदेश न देता टिप्पणी स्वरुपात मंजुरी देण्यात आली़त्यामुळे प्रत्यक्ष दुकानदारनिहाय, मंजूर धान्य व वितरित धान्य यांचा ताळमेळ बसत नाही़ दुकानदारनिहाय मूळ याद्या व प्रत्यक्ष धान्य वितरण यामधील लोकसंख्येत मोठी तफावत आहे़ भोकरमध्ये महिन्याच्या शेवटच्या चार ते पाच दिवसांतच धान्य वाटप अधिक करण्यात आल्यामुळे परमिट नूतनीकरणाची संख्या वाढली़ कोणत्या दुकानात नेमका किती धान्यपुरवठा करायचा याचेही सोयरसुतक नव्हते़ हिमायतनगर येथे आॅगस्ट २०१६ ते आॅक्टोबर २०१६ या कालावधीत ३० हजार ७३५ लाभार्थ्यांना धान्य कोटा मंजूर असताना तहसीलदारांनी ३२ हजार १४८ लाभार्थ्यांना धान्य वितरित केले़हाच कित्ता डिसेंबर २०१६ ते मार्च २०१७ मध्ये गिरविण्यात आला़ २०१७ मध्ये ८९़४८ क्विंटल गहू व ५२़६० क्विंटल तांदूळ उपलब्ध असताना ९६४ क्विंटल गहू व ६४३ क्विंटल तांदळाचे जास्तीचे परमिट वितरित करण्यात आले़अर्धापूर तालुक्यात २५ जानेवारी २०१६ रोजी मंजूर करण्यात आलेले धान्य तीन दिवसांतच पूर्ण वाटप केले़ २५ तारखेनंतर धान्य वाटप लेखी परवानगी न घेता तोंडी सूचनेवरुनच करण्यात आले़ गोदामात धान्य उतरवून घेताना ते प्रमाणित केलेच नाही़ उमरी तालुक्यात अभिलेखे प्रमाणित न करणे, आर रजिस्टर न ठेवणे, शेतकरी योजनेचे कार्ड विनास्वाक्षरी असणे असे प्रकार पुढे आले़ नायगाव तालुक्यात कॅशबुक प्रिंटेड न ठेवणे, परमिट बुकची नोंदवही न ठेवणे, गोदामाची अभिलेखे अद्ययावत नसणे तसेच एकाच दिवशी ४७ स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्य वितरित केल्याचे एच रजिस्टरवरुन आढळून आले़मुदखेड तालुक्यात शेतकरी योजनेच्या लाभार्थी योजनेचे धान्य वर्ग केल्याचे तपासणीत पुढे आले़ सातही तालुक्यांत धान्य वाटपात मोठा गोंधळ झाला आहे, परंतु त्याबाबत अहवाल सादर करण्यास तहसीलदार संबंधित कार्यालयाकडून टाळाटाळ करण्यात येत आहे़लोकसंख्येत केली कुठे घट तर कुठे वाढ४जानेवारी २०१६ ते मार्च २०१६ या कालावधीत लोकसंख्या ६५ हजार ६४० एवढी तर एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत ती चक्क ४७ हजार ७१२ एवढी दाखविण्यात आली होती़ भोकरमध्ये फेब्रुवारी २०१६ चे तांदळाचे नियतन ६७९ क्विंटल मंजूर झाले होते़ तेवढाच तांदूळ मिळालाही़ तेवढाच प्रत्यक्ष वाटप होणे अपेक्षित असताना इतर योजनेतून २१७़७० क्विंटल तांदूळ वर्ग करुन घेण्यात आला़ विशेष म्हणजे, त्याबाबत कुठलाही पत्रव्यवहार करण्यात आला नाही़कोट्यवधींचा गैरव्यवहारप्रकरणाचा पाठपुरावा करणारे आरटीआय कार्यकर्ते मोतीराम काळे म्हणाले, या सातही तालुक्यांत कोट्यवधी रुपयांचा धान्य घोटाळा झाला आहे़ लाभार्थ्यांची संख्या फुगविणे, रजिस्टरवर नोंदी न घेणे, द्वारपोच धान्य न देणे यासारख्या अनेक क्लृप्त्या त्यासाठी लढवल्या आहेत़
सात तालुक्यांत लाखोंचा धान्य घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:57 AM
नांदेड: बीड जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या पथकाने नांदेड जिल्ह्यात केलेल्या गोदामांच्या तपासणीत धान्य उचल, अभिलेख पडताळणीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असल्याचे उघडकीस आले आहे़ किनवट, भोकर, हिमायतनगर, अर्धापूर, उमरी, नायगाव व मुदखेड तालुक्यात लाभार्थ्यांचा आकडा फुगवून दाखविण्यात आला तर कुठे द्वारपोच धान्यालाही फाटा देण्यात आला़ विशेष म्हणजे, याबाबत नांदेड जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी तीन वेळेस अहवाल सादर करण्याचे आदेश देवूनही संबंधित तहसीलदारांनी त्यालाही केराची टोपली दाखविली़
ठळक मुद्देपुरवठा विभाग : बीडच्या पथकाने केला पर्दाफाश;मंजूर व वितरित धान्याचा ताळमेळ बसेना