नांदेड : झारखंड येथे घडलेल्या मॉबलिंचिंग प्रकरणातील मयत तबरेज अन्सारी याच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी, मायनॉरिटी अॅट्रॉसिटी अॅक्टची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी शुक्रवारी दुपारी मुस्लिम बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते़चोरीचा संशय घेवून झारखंड येथे जमावाने तबरेज अन्सारी या तरुणाला बेदम मारहाण केली होती़ या मारहाणीत तबरेजचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती़ या घटनेचे देशभर तीव्र पडसाद उमटत आहेत़ या घटनेच्या निषेधार्थ नांदेडात मुस्लिम बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी तबरेजच्या मारेकºयाला फाशी द्या, बाबासाहेब आंबेडकर यांच्या देशात हिंसा चालणार नाही, यासह मॉबलिंचिंगला आळा घाला आदी घोषणांची फलके तरुणांच्या हातात होती़ दुपारी दोन वाजेपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लिम बांधवांनी मोठी गर्दी केली होती़आंदोलनात तरुणांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता़ त्यानंतर शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले़
मुस्लिम बांधवांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:31 AM