नांदेड - राज्यभर गाजत असलेल्या एमपीएससी डमी परीक्षार्थी प्रकरणात विशेष तपास पथकाने मंगळवारी नांदेड जिल्हा परिषदेतील सहायक अभियंता विशाल रंगराव पवार (रा़ राजगड तांडा, ता़ किनवट) व मंत्रालयातील अन्न व नागरी पुरवठा विभागातील वरिष्ठ लिपीक बाळासाहेब व्यंकट भातलोंढे (बोरावटी जि़लातूर) या दोघांच्या मुसक्या आवळल्या. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.एमपीएससी डमी परीक्षार्थी प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. अटक करण्यात आलेल्या ३६ जणांपैकी ४ जणांना जामीन मिळाला आहे़ सोमवारी एसआयटीने लक्ष्मण शंकर चव्हाण, धनराज नरसिंग राठोड, अनिल रावसिंग जाधव, स्वप्निल शिवाजी पवार, सुनील बन्सी राठोड, कुणाल विनोद राठोड, चंदन केवलसिंघ राठोड, शिवप्रसाद विजय डुमणे या आठ जणांना अटक केली होती़ या आरोपींमध्ये तलाठी, लिपीक, कालवा निरीक्षक, वरिष्ठ लिपीक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, शिक्षक या पदावर कार्यरत असलेल्यांचा समावेश होता़ या सर्वांना सोमवारी रात्री १० वाजता किनवट न्यायालयाने ११ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ त्यानंतर मंगळवारी या प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही मंगळवारी किनवट न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़डमी परीक्षार्थीद्वारे मिळविल्या नोकऱ्याविशाल रंगराव पवार आणि बाळासाहेब व्यंकट भातलोंढे या दोघांनीही स्वत: परीक्षा न देता, आपल्या जागी डमी उमेदवार परिक्षेसाठी बसविला़ या उमेदवाराच्या माध्यमातूनच विशाल पवारने नांदेड जिल्हा परिषदेत सहायक अभियंता तर बाळासाहेब भातलोंढे याने मंत्रालयातील अन्न व नागरीपुरवठा विभागात वरिष्ठ लिपिक म्हणून नोकºया मिळविल्या़ अखेर मंगळवारी दोघांना अटक करण्यात आली़
एमपीएससी डमी परीक्षार्थी प्रकरण : मंत्रालयातील लिपिकासह जि़प़ अभियंता जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 5:01 AM