नांदेड: दहावीत 75 टक्के गुण मिळवल्यानंतर बारावीत आणखी चांगले यश मिळवण्यासाठी काही दिवस मैत्रिणींच्या मोबाईल वरून ऑनलाइन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीने वडिलांकडे मोबाईल घेऊन देण्याचा हट्ट केला. परंतु मजुरी करणाऱ्या वडिलांची मोबाईल घेण्याची ऐपत नव्हती. त्यामुळे हताश झालेल्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
नांदेड जिल्ह्यातील नायगांव शहरातील ही दुर्दैवी घटना आहे. सतरा वर्षीय बुद्धीशी पोटफोडे असे मयत तरुणीचे नाव आहे. दहावीला 75 टक्के मार्क मिळवणाऱ्या बुद्धिशीला बारावीच्या परीक्षेसाठी अभ्यास करायचा होता, त्यासाठी तिने मोबाईलचा हट्ट धरला होता. मात्र मजुरी करणारे तिचे वडील प्रकाश पोटफोडे हे तिला मोबाईल घेऊन देऊ शकले नाहीत. त्यामुळे हताश झालेल्या गुणवान तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवले. एकीकडे दहावी बारावीची परीक्षाच होत नसल्याने विद्यार्थी या टोकाला जाऊन का निर्णय घेतात असा प्रश्न उपस्थित होतोय.