नांदेड जिल्ह्यात गोदावरीवरील १३ सिंचन योजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:53 AM2018-04-13T00:53:23+5:302018-04-13T00:53:23+5:30

गोदावरी नदीवर कार्यान्वित १३ उपसा जलसिंचन योजना बंद पडल्या आहेत. या योजनांसाठी वापरात येणारे जवळपास ७४ दलघमी पाणी तेलंगणात जात आहे. तर दुसरीकडे वाढत्या उष्णतेमुळे जलाशयातील साठ्यात झपाट्याने घट होत असून आजघडीला केवळ ३७.४५ टक्के जलसाठा उरला आहे.

Nanded district closed 13 irrigation projects on Godavari | नांदेड जिल्ह्यात गोदावरीवरील १३ सिंचन योजना बंद

नांदेड जिल्ह्यात गोदावरीवरील १३ सिंचन योजना बंद

Next
ठळक मुद्देअपुरे पर्जन्यमान : वाढत्या उष्णतेमुळे जलसाठ्यात झपाट्याने घट; जिल्ह्यात ३७ टक्के जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : गोदावरी नदीवर कार्यान्वित १३ उपसा जलसिंचन योजना बंद पडल्या आहेत. या योजनांसाठी वापरात येणारे जवळपास ७४ दलघमी पाणी तेलंगणात जात आहे. तर दुसरीकडे वाढत्या उष्णतेमुळे जलाशयातील साठ्यात झपाट्याने घट होत असून आजघडीला केवळ ३७.४५ टक्के जलसाठा उरला आहे.
जिल्ह्यात २०१६ मध्ये सरासरीच्या तुलनेत ११३ टक्के पाऊस झाला होता. २०१७ मध्ये मात्र त्यात घट होऊन केवळ ६७ टक्के पाऊस झाला. परिणामी जिल्ह्यातील विष्णूपुरी वगळता अन्य मोठे प्रकल्प भरले नव्हते. आजघडीला विष्णूपुरी प्रकल्पात जवळपास १३ दलघमी तर कंधार तालुक्यातील मानार प्रकल्पात १३.५४० जलसाठा आहे. हा जलसाठा केवळ ९ टक्के उरला आहे. मध्यम प्रकल्पात कंधार तालुक्यातील महालिंगी प्रकल्प कोरडाठाक आहे तर मुखेड तालुक्यातील कुंद्राळा प्रकल्पात केवळ ३.६९६ टक्के जलसाठा उरला आहे. पेठवडज प्रकल्पात १० टक्के, किनवट तालुक्यातील लोणी प्रकल्पात ११ टक्के, लोहा तालुक्यातील उर्ध्व मानार प्रकल्पात ३१ टक्के, किनवट तालुक्यातील डोंगरगाव मध्यम प्रकल्पात ४१ टक्के, उमरी तालुक्यातील कुदळा मध्यम प्रकल्पात ४४ टक्के आणि देगलूर तालुक्यातील करडखेड मध्यम प्रकल्पात ६१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना चालविणे हे आगामी काळात जिकिरीचे ठरणार आहे. जिल्ह्यात आजघडीला ३६ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून मुखेड तालुक्यात सर्वाधिक १६ गावांत आणि त्या खालोखाल नांदेड तालुक्यात १० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. माहूरमध्ये ३, हदगाव, किनवटमध्ये २ तर भोकर, हिमायतनगर, कंधार, किनवटमध्ये प्रत्येकी एका टँकरने पाणीपुरवठा केला जातो़ हदगाव, भोकर, हिमायतनगर, अर्धापूर, मुदखेड, उमरी तालुक्यांत सिंचनासाठी वरदान ठरलेला इसापूर प्रकल्प यंदा मात्र तळाला गेला आहे. १२७९ दलघमी साठा क्षमता असलेल्या प्रकल्पात आजघडीला केवळ ९.९१० दलघमी जलसाठा शिल्लक राहिला आहे़

सात हजार हेक्टर सिंंचनावर परिणाम
जिल्ह्यात गोदावरी नदीवर कार्यान्वित असलेल्या १३ उपसा जलसिंचन योजना बंद पडल्या आहेत. या योजनांसाठी वापरात येणारे जवळपास ७४ दलघमी पाणी तेलंगणात जात आहे. गोदावरी नदीवर १९७५ ते १९८३ या कालावधीत १३ उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित होत्या. मात्र पुढील कालावधीत त्या बंद पडल्या. जवळपास ७४ दलघमी पाणी या सिंचन योजनासाठी वापरात येत होते. त्या त्या भागातील शेतकऱ्यांना निश्चितपणे त्याचा लाभ होत होता. मात्र पावसाची अनियमितता यामुळे या जलसिंचन योजना सुरू ठेवण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आजघडीला बाभळी बंधाºयातून सोडण्यात येणाºया पाण्याबाबत चिंता व्यक्त केली जात असताना या बंद उपसा जलसिंचन योजनाकडे मात्र दुर्लक्षच होत आहे. त्याच वेळी या योजना प्रत्यक्ष व्यवहार्य नसल्याची बाब पुढे आली आहे.
या १३ उपसा जलसिंचन योजना नव्याने कार्यान्वित करण्यासाठी जवळपास दीडशे कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. हा खर्च केल्यानंतरही प्रत्यक्ष होणारे सिंचन ही बाब तुलनात्मकदृष्ट्या नुकसानकारक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. दरम्यान, बाभळी बंधारा कृती समितीच्या पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची भेट घेतली़ बंधाºयातून सोडण्यात येणाºया पाण्याच्या वेळेबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबत चर्चा करण्यात आली.बंधाºयातून पाणी सोडण्यात आल्याने आजघडीला हा बंधारा कोरडा पडला आहे. यावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबत या बैठकीत चर्चा केली़ उपसा सिंचन योजनेमुळे ७ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली होते़ सचिव प्रा़डॉ़बालाजी कोम्पलवार, अध्यक्ष नागोराव जाधव रोशनगावकर, उपजिल्हाधिकारी सचिन खल्लाळ, उपअभियंता प्रशांत पाटील करखेलीकर आदींची उपस्थिती होती़

एकात्मिक जलआराखडा मंजूर : राज्याचा एकात्मिक जलआराखडा नुकताच मंजूर करण्यात आला आहे. या आराखड्यात तब्बल ५०२ दलघमी पाणी मध्य गोदावरीसाठी मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे उपलब्ध होणाºया या पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. नियोजन न झाल्यास हे पाणीही तेलंगणात जाणार आहे. गोदावरी नदीवर असलेल्या १२ बंधाºयांच्या साखळीशिवाय अन्य बंधाºयांची उभारणी गोदावरी नदीवर करावी लागणार आहे. परभणी जिल्ह्यातील मुळी प्रकल्पापासून खालील बाजूस पाणी अडवावे लागणार आहे. त्यामुळे आता या मंजूर झालेल्या एकात्मिक जलआराखड्यातून प्राप्त होणाºया ५०२ दलघमी पाण्याचे नियोजन योग्यरित्या मध्य गोदावरीसाठी करावे लागणार आहे.

Web Title: Nanded district closed 13 irrigation projects on Godavari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.