राज्यशास्त्र शिक्षक परिषदेची नांदेड जिल्हा कार्यकारिणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:50 AM2021-02-20T04:50:44+5:302021-02-20T04:50:44+5:30
महाराष्ट्रातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांत राज्यशास्त्र विषय शिकविणाऱ्या प्राध्यापकांना संघटित करून त्यांचे शैक्षणिक, व्यावसायिक प्रश्न सोडविणे, राज्यशास्त्र विषयाचे शैक्षणिक साहित्य ...
महाराष्ट्रातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांत राज्यशास्त्र विषय शिकविणाऱ्या प्राध्यापकांना संघटित करून त्यांचे शैक्षणिक, व्यावसायिक प्रश्न सोडविणे, राज्यशास्त्र विषयाचे शैक्षणिक साहित्य निर्माण करून त्याचे शिक्षकांमध्ये आदानप्रदान करून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, पुनर्रचित अभ्यासक्रमावर व्यापक चर्चा घडवून आणणे अशा व्यापक उद्देशाने प्रा. सुमित पवार (राज्याध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालय परिषद स्थापन करण्यात आली.
ऑनलाईन मीटिंगच्या माध्यमातून लातूर विभागाचे विभागीय अध्यक्ष प्रा. डी. डी. मस्के तसेच विभागीय महासचिव प्रा. बालाजी बिरादार यांनी तीन जिल्ह्यांतील जिल्हा कार्यकारिणी घोषित केली. नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा. पांडव मुंगनाळे, प्रा. गुलाबराव मोरे, प्रा. हनमंत मटके, सहसचिवपदी प्रा. गंगाधर ताडोड, डॉ. व्यंकट सूर्यवंशी, प्रा. सखाराम परसुरे, प्रा. गजानन कदम, महिला जिल्हाप्रमुखपदी प्रा. अनिता देबडवार, जिल्हा समन्वयक प्रा. एकनाथ जाधव, जिल्हा कोषाध्यक्षपदी प्रा. ज्ञानेश्वर हसनाळे, जिल्हा कार्यालय प्रमुख प्रा. राजेश शिरफुले, प्रसिद्धीप्रमुख प्रा. शेषीकांत धानोरकर, सोशल मीडिया प्रमुख प्रा. सायलू शेट्टीवार, तर कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रा. हणमंत पाटील, डॉ. रत्ना कोमावार, प्रा. शिवरामपंत कुलकर्णी, प्रा. प्रकाश जाधव, प्रा. गिरीश वट्टमवार, प्रा. रामदास बोकारे, प्रा. ज्ञानोबा जाधव, प्रा. संजयश्री पाटील, प्रा. मन्मथ मुक्तापुरे, प्रा. मंगा नामपल्ले, प्रा. मनोहर ओसावार, प्रा. माधव बंडे, प्रा. जयसिंग पाटील, प्रा. निर्मला धोंगडे, प्रा. शुभांगी तावडे, प्रा. जी. एम. फुगारे यांची निवड करण्यात आली.