लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : राजकीय पातळीवर प्रमुख पक्षांकडून निवडणूक मोर्चेबांधणी सुरू असतानाच निवडणूक विभागही तयारीला लागल्याचे चित्र आहे. बंगळुरुहून सहा हजारांहून अधिक मतदान यंत्रे नांदेडला दाखल झाले असून या यंत्राची सध्या छायाचित्रे काढून बारकोड स्कॅनिंग करण्यात येत आहे. दुसरीकडे मतदार यादीतील पुरवणी याद्या आणि विलीनीकरण व एकत्रिकरण करुन प्रारुप मतदारयादी तयार करण्याचे कामही प्रगतीपथावर आहे.निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे होण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्ष गतिमान झाले असून निवडणूक मोर्चेबांधणीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी काम सुरू केले आहे. याचवेळी निवडणूक विभागाकडूनही आगामी निवडणुकांची तयारी सुरू आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशावरुन बंगळुरु येथून ६ हजार ३१० बॅलेट युनिट आणि ३ हजार ६७० कंट्रोल युनिट नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. सध्या ही सर्व यंत्रे खुपसरवाडी येथील गोदामात ठेवण्यात आले असून तेथे सध्या ट्रॅकींगचे काम सुरू आहे. आयोगाकडून प्राप्त झालेल्या मतदान यंत्रांच्या बारकोडचे स्कॅनिंग करण्यात येत असून येत्या काही दिवसांत व्हीव्हीपॅट मशीनही उपलब्ध होणार आहेत.दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशावरुन सध्या जिल्हा निवडणूक विभागातर्फे छायाचित्र मतदार यादीच्या पुनरिक्षणाचे काम सुरू आहे. ३१ जुलैपर्यंत निवडणूक विभागाने मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण केले असून ३१ आॅगस्टपर्यंत कंट्रोल टेबल अद्ययावत करणे, पुरवणी याद्या तयार करणे आणि विलीनीकरण व एकत्रिकरण करुन प्रारुप मतदारयादी तयार करण्यात येत आहे.१ सप्टेंबरपासून या मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात येणार असून १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत मतदार याद्यावर नागरिकांचे दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. हे दावे व हरकती ३० नोव्हेंबरपूर्वी निकालात काढण्यात येणार असून ३ जानेवारीपूर्वी डाटाबेसचे अद्ययावतीकरण आणि पुरवणी यादीची छपाई करण्यात येणार असून ४ जानेवारी रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागातर्फे देण्यात आली.
नांदेडात सहा हजार मतदान यंत्रे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:40 AM
राजकीय पातळीवर प्रमुख पक्षांकडून निवडणूक मोर्चेबांधणी सुरू असतानाच निवडणूक विभागही तयारीला लागल्याचे चित्र आहे. बंगळुरुहून सहा हजारांहून अधिक मतदान यंत्रे नांदेडला दाखल झाले असून या यंत्राची सध्या छायाचित्रे काढून बारकोड स्कॅनिंग करण्यात येत आहे. दुसरीकडे मतदार यादीतील पुरवणी याद्या आणि विलीनीकरण व एकत्रिकरण करुन प्रारुप मतदारयादी तयार करण्याचे कामही प्रगतीपथावर आहे.
ठळक मुद्देनिवडणूक विभाग लागला कामाला