नांदेड : ऐतिहासिक, धार्मिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या नांदेड शहराची आता नवी ओळख सामाजिक समतेचा संदेश देणारे शहर म्हणून होणार आहे. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या फुले दाम्पत्याचा पुतळा दिमाखदारपणे साकारला जात असून या पुतळ्याचे ३ जानेवारी रोजी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या हस्ते अनावरण होत आहे.शहरात पावडेवाडी भागात आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांचा १२ फूट पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला. या पुतळ्याचे उद्घाटन राजर्षी शाहू महाराजांचे वंशज श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. या पुतळ्याच्या उभारणीनंतर सामाजिक समतेचा संदेश देणारे शहर म्हणून नांदेडकडे पाहिल्या जावू लागले.आता फुले दाम्पत्याच्या पुतळ्याचे उद्घाटनही होत आहे. या उद्घाटनासाठी महापालिकेने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना निमंत्रित करण्यात आले आहे. खा. अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.शहरातील महात्मा फुले चौक येथे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे प्रत्येकी ९ फूट उंचीचे पुतळे उभारण्यात येत आहेत. या पुतळ्यांवर ४० लाखांचा खर्च केला आहे. जागेच्या प्रश्नामुळे जवळपास ५ वर्षे हे काम थांबले होते. जागेचा प्रश्न मिटताच या कामाला महापालिकेने प्रारंभ केला. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची जागा हस्तांतरित करुन हा प्रश्न सोडविण्यात आला होता. या पुतळ्याच्या सुशोभिकरणासाठी जवळपास ५५ लाख तर विद्युतीकरणासाठी १० लाख आणि अन्य कामांसाठी १४ लाख रुपये खर्च करण्यात येत आहे. जवळपास १ कोटी १७ लाख रुपये खर्चून हे काम पूर्ण केले जाणार आहे.सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी म्हणजेच ३ जानेवारी रोजी या पुतळ्याचे उद्घाटन होणार आहे. यावेळी पालकमंत्री रामदास कदम, हिंगोलीचे खा. राजीव सातव यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. आयटीआय परिसरात ३ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता उद्घाटन सोहळा होणार आहे.शहरात आजघडीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, महाराणा प्रताप, अण्णाभाऊ साठे, राजर्षी शाहू महाराज यांचे पूर्णाकृती पुतळे उभे आहेत.या पुतळ्याद्वारे सामाजिक समतेचा संदेश तसेच त्यांच्या कार्याची प्रेरणा नांदेडकरांना सदोदितपणे मिळत आहे. आता ३ जानेवारीपासून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या माध्यमातून स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडून देणाºया या दाम्पत्यांच्या कार्याची प्रेरणाही मिळणार आहे.
सामाजिक समतेच्या संदेशाचा नांदेड पॅटर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:38 AM
ऐतिहासिक, धार्मिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या नांदेड शहराची आता नवी ओळख सामाजिक समतेचा संदेश देणारे शहर म्हणून होणार आहे. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या फुले दाम्पत्याचा पुतळा दिमाखदारपणे साकारला जात असून या पुतळ्याचे ३ जानेवारी रोजी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या हस्ते अनावरण होत आहे.
ठळक मुद्देफुले दाम्पत्याच्या पुतळ्याने वैभवात भर