नांदेडमध्ये नियोजित वर - वधूंना लुबाडले; १ लाखाचा माल लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 07:17 PM2018-05-08T19:17:19+5:302018-05-08T19:17:19+5:30

शहरातील कॅनॉल रोड परिसरात खरेदी करुन रस्त्यावर नियोजित वर-वधू थांबले होते़ यावेळी अज्ञात तीन आरोपींनी नियोजित वराला थापड बुक्क्यांनी मारहाण करुन त्यांच्याजवळील १ लाख १९ हजार रुपयांचे माल लंपास केल्याची घटना सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली़

Nanded planned on - spoiled brides; Lump of goods of 1 lac | नांदेडमध्ये नियोजित वर - वधूंना लुबाडले; १ लाखाचा माल लंपास 

नांदेडमध्ये नियोजित वर - वधूंना लुबाडले; १ लाखाचा माल लंपास 

Next

नांदेड : शहरातील कॅनॉल रोड परिसरात खरेदी करुन रस्त्यावर नियोजित वर-वधू थांबले होते़ यावेळी अज्ञात तीन आरोपींनी नियोजित वराला थापड बुक्क्यांनी मारहाण करुन त्यांच्याजवळील १ लाख १९ हजार रुपयांचे माल लंपास केल्याची घटना सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली़ या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे़.

अनिकेत रोहित अटकलवार रा़दिलीपसिंघ कॉलनी हे आपली होणारी पत्नी दर्शनी मामीडवार यांच्यासोबत सोमवारी रात्री डीमार्ट येथे लग्नाची खरेदी करण्यासाठी गेले होते़ साहित्य खरेदीसाठी त्यांना रात्रीचे दहा वाजले़ डी मार्टच्या बाहेर आल्यानंतर हॉटेल सम्राटकडे जाणाºया रस्त्यावर हे दोघेही नियोजित वर-वधू बोलत थांबले होते़ यावेळी अज्ञात तिघे जण त्यांच्याजवळ आले़ यावेळी त्यांनी अनिकेत अटकलवार यांच्यासोबत वाद घालत त्यांना थापड बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली़ 

यावेळी दर्शनी मामीडवार यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला़ परंतु आरोपींनी त्यांनाही धमकाविले़ त्यानंतर धमकावून अनिकेत यांच्याजवळील ६० हजार रुपये किमतीचा अ‍ॅपल कंपनीचा मोबाईल, दर्शनी मामीडवार यांच्याजवळील ५० हजार रुपये किमतीचा मोबाईल, रोख आठ हजार रुपये असा एकुण १ लाख १९ हजार रुपयांचा माल आरोपींनी लंपास केला़ अचानक घडलेल्या या प्रकारात नियोजित वर अन् वधू दोघांनाही धक्का बसला़ यावेळी त्यांनी आरडाओरडही केली़ परंतु तोपर्यंत आरोपी पसार झाले होते़ या प्रकरणात अनिकेत अटकलवार यांच्या तक्रारीवरुन भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ तपास पोउपनि सी.जी. ढेमकेवाड हे करीत आहेत.

Web Title: Nanded planned on - spoiled brides; Lump of goods of 1 lac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.