नांदेड: कोरोनाचा धोका वाढतच असतानाही या आजारासंबंधीची भिती तसेच तणाव हळूहळू कमी करण्यात प्रशासनाला यश येत आहे. पहिल्या टप्प्यात काही दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी दिल्यानंतर आता इतर प्रतिष्ठाणे सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून, शनिवारी गर्दीची ठिकाणे वगळून सर्व बाजारपेठ खुली करण्यात येणार आहे. संपूर्ण आठवडाभर ही दुकाने सकाळी ९ ते ५ या वेळेत उघडी राहणार असल्याने लॉकडाऊनमुळे ठप्प झालेले व्यवहार आता सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी दोन वेळा आदेश काढून आस्थापनांना सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंतची परवानगी दिली होती़ आता त्यात वाढ करण्यात आली आहे़ क्रिडा कॉम्पलेक्स आणि स्टेडीयम आणि इतर सार्वजनिक खुली जागा वैयक्तीक व्यायामा करीता मोकळी राहिल़ या ठिकाणी प्रेक्षक किंवा सामुहिक खेळाला मुभा नाही़ दुचाकीवर १ व्यक्ती, तीन चाकीमध्ये एक चालक अन् दोन व्यक्ती तर चार चाकीत १ चालक आणि दोन व्यक्तींना परवानगी राहणार आहे़ ५० टक्के क्षमतेनुसार जिल्ह्यांतर्गत बससेवा सुुरु करण्यात आली आहे़ सर्व दुकाने, बाजारपेठा ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे़ परंतु या ठिकाणी गर्दी वाढल्यास किंवा सामाजिक अंतर न पाळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे़ ही सर्व दुकाने कंटेमनेंट झोन बंदच राहतील़ फक्त जीवनाश्यक वस्तुंचा पुरवठा तसेच अत्यावश्यक वैद्यकीय सेवांना कंटेनमेंट झोनमध्ये परवानगी राहणार आहे़
नियम मोडल्यास हजाराचा दंडकामाच्या ठिकाणी प्रवेशापूर्वी हँडवॉश, सॅनिटायझरचा वापर करणे, एका वेळेस दुकानात पाच पेक्षा जास्त ग्राहकास प्रवेश राहणार नाही़ दुकानातील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर मास्क, सामाजिक अंतर राखणे गरजेचे़ अन्यथा एक हजारांचा दंड आकारण्यात येणार आहे़ मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व वस्तुंचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहणार आहे़
लग्न समारंभासाठी आता ५० जणांना परवानालग्न समारंभासाठी यापूर्वी फक्त २० आमंत्रितांना परवानगी देण्यात आली होती़ त्यात वाढ करुन ती ५० करण्यात आली आहे़ लग्न सकाळी ७ ते ५ या वेळेतच पार पाडणे आवश्यक आहे़ सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे़ अत्यंविधीमध्येही ५० जणांना परवानगी देण्यात आली आहे़ दारु, पान, गुटखा, तंबाखूचे सार्वजनिक ठिकाणी सेवन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे़
तपासणीसाठी पथकांची नियुक्तीदुकाने उघडी ठेवण्यासाठी अटी आणि शर्थींचे पालन करावे लागणार आहे़ त्याची योग्य अंमलबजावणी होते किंवा नाही हे तपासण्यासाठी पथकांची स्थापना करण्यात आली आहे़ महापालिका हद्दीत मनपा व पोलिसांचे संयुक्त पथक राहणार आहे़ नगरपालिका हद्दीत नगरपालिका आणि पोलिस तर गावपातळीवर ग्रामपंचायत व पोलितसांचे पथक राहणार आहे़
ही प्रतिष्ठाणे राहणार बंदचसर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था व शिकवणी वर्ग बंदच राहतील़ आॅनलाईन आणि आंतर शिक्षण यास मुभा राहणार आहे़ हॉटेल, रेस्टॉरंट, इतर हॉस्पीटॅलिटीच्या सेवा, गृहनिर्माण आरोग्य, पोलिस, शासकीय अधिकारी, आरोग्य सेवा कर्मचारी, पर्यटकांसह अडकलेल्या व्यक्ती आणि विलगीकरण सुविधेसाठी वापरता येणार आहेत़ या सेवेसाठीच बस स्टॉप, रेल्वेस्टेशन येथे सुरु असलेल्या कॅन्टीनचा वापर करता येणार आहे़ रेस्टॉरंटला खाद्यपदार्थाच्या होम डिलिव्हरीसाठी स्वंयपाकघर वापरण्यास मुभा आहे़ सर्व सिनेमा हॉल, शॉपींग मॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार आणि सभागृह, असेंब्ली हॉल हे बंद राहतील़ सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, करमवणुक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्य, इतर मेळावे, मोठ्या धार्मिक सभांना प्रतिबंध असेल़ सर्व धार्मिक स्थळे, पुजेची ठिकाणी भाविकांसाठी बंद असतील़ सर्व आठवडी बाजारांनाही परवानगी देण्यात आली नाही़ सर्व ढाबे, तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थाची दुकाने, चहा-कॉफी सेंटर, पानठेला व शितपेयाची दुकाने बंद राहतील़