पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्यासाठी नसोसवायफचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:18 AM2021-01-23T04:18:01+5:302021-01-23T04:18:01+5:30
शैक्षणिक वर्ष २०१९-२०कोविड -१९च्या लॉकडाऊनमध्ये गेले आहे. पण, या शैक्षणिक वर्षात मोठ्या प्रमाणात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थी ...
शैक्षणिक वर्ष २०१९-२०कोविड -१९च्या लॉकडाऊनमध्ये गेले आहे. पण, या शैक्षणिक वर्षात मोठ्या प्रमाणात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थी मोठ्या पदवी उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे उत्तीर्ण होणाऱ्या प्रमाणापेक्षा पदवी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दुपटीपेक्षा अधिक आहे. तसेच या प्रमाणापेक्षा पदवीत्तर अभ्यासक्रमाच्या जागा खूपच कमी आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी हे उच्च शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे राज्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर या दुष्काळी व अविकसित जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी स्थापित केले होते. या चारही जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांची पहिलीच आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय व संकुलामध्ये पदवीत्तरअभ्यासक्रमाच्या जागा अल्प असल्याने त्यांना प्रवेश मिळू शकत नाही. या संदर्भात नसोसवायएफच्या शिष्टमंडळाने विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्याकडे शिष्टमंडळाद्वारे चर्चा केली. पण, या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. मागील दोन वर्षांपासून २० टक्क्यांपेक्षा अधिक जागा कुठलेही विद्यार्थी संघटनेची मागणी नसताना कुलगुरूंनी वाढविली आहे. मग याच शैक्षणिक वर्षात या नियमावर बोट ठेवून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून का वंचित ठेवले जात आहे, असा सवाल केला आहे. २३ उपोषणाचे नेतृत्व संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. डी. हर्षवर्धन हे करणार आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे राज्य प्रवक्ते प्रा. सतीश वागरे यांनी केले आहे.