कृषी कार्यालयाकडून परमिट मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:17 AM2019-06-22T00:17:15+5:302019-06-22T00:20:49+5:30

तालुक्यात अजून पावसाने हजेरी लावली नसली तरीही शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण करुन शेती पेरणीसाठी सज्ज ठेवली आहे. कृषी दुकानात बी-बियाणे दाखल झाले असले तरीही महामंडळाकडून एक महिन्यापूर्वी दाखल सबसीडीच्या बियाणांकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे, मात्र, कृषी कार्यालय मात्र परमीट देण्यास तयार नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.

Not Get a permit from the Agriculture Office | कृषी कार्यालयाकडून परमिट मिळेना

कृषी कार्यालयाकडून परमिट मिळेना

Next
ठळक मुद्देहिमायतनगर तालुक्याचे चित्र महामंडळाचे बियाणे महिनाभरापासून दाखल, संबंधितांच्या दुर्लक्षाने

कोंडबा कवडे।

हिमायतनगर : तालुक्यात अजून पावसाने हजेरी लावली नसली तरीही शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण करुन शेती पेरणीसाठी सज्ज ठेवली आहे. कृषी दुकानात बी-बियाणे दाखल झाले असले तरीही महामंडळाकडून एक महिन्यापूर्वी दाखल सबसीडीच्या बियाणांकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे, मात्र, कृषी कार्यालय मात्र परमीट देण्यास तयार नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.
सबीसीडीचे परमीट महामंडळकडून अजून आले नाहीत, असे एकमेव उत्तर संबंधितांकडून शेतकऱ्यांना दिले जात आहे. यात मोठी ‘गोम’ असल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे. कृषी केंद्र चालक, महामंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये ‘मिलीभगत’ असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे.
गतवर्षी शेतकऱ्यांच्या पदरी बोगस बियाणे पडल्याने मोठे नुकसान झाले होते. पाऊसही कमी पडल्याने उत्पादनात कमालीची घट झाली. यावेळी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी असून, पाऊस पडला की, पेरणीच्या कामाला लागण्याचे संकेत शेतकऱ्यांनी दिले आहेत.
शेतकऱ्यांना सबसीडीचा लाभ मिळण्यासाठी महामंडळाच्या वतीने कृषी कार्यालयात परमीट बुक पाठवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. यासंदर्भात जबाबदार कुणीही बोलण्यास तयार नाही. नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वरिष्ठांनीच आता या कामी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे़
महांडळकडून अजून आले नाहीत, असे एकमेव उत्तर संबंधितांकडून शेतकऱ्यांना दिले जात आहे. यात मोठी ‘गोम’ असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कृषी केंद्र चालक, महामंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये ‘मिलीभगत’ असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. महिनाभरापूर्वीच महामंडळाचे बियाणे दाखल झालेले असताना परमीट कसे काय आले नाही? असा सवाल शेतकरी करीत आहेत.
महिनाभरापूर्वीच महामंडळाचे बियाणे दाखल झालेले असताना परमीट कसे काय आले नाही? असा सवाल शेतकरी करीत आहेत. परमीट नसल्याचे सांगून काही दुकानदार बियाणांची चढ्या दराने विक्री करीत असल्याचा आरोप आहे.
हिमायतनगरातील काही व्यापाऱ्यांनी गोदामत बोगस खताचा भरणा केल्याच्या अफवेनेही काही दिवसापूर्वी जोर धरला होता. मात्र ‘मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार’ या युक्तीप्रमाणे पुढे काहीही झाले नाही. त्यामुळे कृषी केंद्रातील खते, बी-बियाणे, औषधांचे सॅपल तपासण्याची गरज शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Web Title: Not Get a permit from the Agriculture Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.