वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी आता आमदारांना कोटीचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:17 AM2021-04-18T04:17:09+5:302021-04-18T04:17:09+5:30
मागील काही दिवसांत राज्यातील विविध जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाची स्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे उपलब्ध आरोग्य सुविधेवर प्रचंड ताण आला ...
मागील काही दिवसांत राज्यातील विविध जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाची स्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे उपलब्ध आरोग्य सुविधेवर प्रचंड ताण आला असून या सुविधांची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवत आहे. त्यामुळेच आरोग्य यंत्रणा अधिक सुसज्ज होण्याच्या उद्देशाने घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. या निधीतून आता आमदारांना ऑक्सिजन सिलिंडर, बायपेप मशीन, हॉस्पिटल बेड्स, एमर्जन्सी ट्रॉली, व्हॅक्सिन बॉक्स, पेशंट ट्रॉली, मॉनिटर्स, फ्रिज, प्रतिबंधात्मक औषधी आणि आरोग्यविषयक साधन सामुग्री खरेदी करता येणार आहे. यासाठी २०२१-२२ या वर्षाकरिता स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत खरेदी करावयाच्या वैद्यकीय साहित्य, सामुग्रीसाठी आमदारांनी निधीची शिफारस केल्यानंतर जिल्हाधिकारी त्यास प्रशासकीय मान्यता देणार असून जिल्हा शल्य चिकित्सक तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी आणि आवश्यकतेनुसार मनपा आयुक्त यांना त्याची खरेदी करता येईल असे शासनाने स्पष्ट केले आहे.