आंबेडकर सभागृहासाठी जागा द्यावी
नांदेड : भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे हाेणाऱ्या सभागृहासाठी विक्रीकर भवनची जागा द्यावी, अशी मागणी माधवराव हनमंते यांनी केली आहे. शहरात रेल्वे स्टेशन समाेर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आहे. या पुतळ्याच्या मागे विक्रीकर कार्यालय आहे. या कार्यालयाची जागा संपादित करून सभागृह उभारावे, यासाठी विक्रीकर भवन इतरत्र हलवून या सभागृहाचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी हनमंते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
वाहतूक सिग्नल बसविण्याची मागणी
नांदेड : शहरातील छत्रपती चाैक, माेर चाैक आणि हिंगाेली गेट येथे वाहतूक सिग्नल बसवावे, अशी मागणी भाजपाचे रमेश गटलेवार यांनी केली आहे. उपराेक्त भागात वाहतूक पाेलीस राहत नाहीत, सिग्नलही नाही. त्यामुळे अपघात हाेतात. येथे वाहतूक पाेलिसाची नियुक्ती करावी, तसेच वाहतूक सिग्नल बसवावे, अशी मागणी मनपा आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
शिवभाेजन थाळी केंद्र सुरू करण्याची मागणी
नांदेड : जुन्या नांदेडातील चाैफाळा भागात शिवभाेजन थाळी केंद्र सुरू करण्याची मागणी गणेश हारकरे, बाबू सुंकेवार, मनीष झगडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. देगलूर नाका येथे शिवभाेजन थाळी केंद्र आहे, मात्र तेथे चांगली वागणूक दिली जात नसल्याची तक्रारही केली जात आहे. चाैफाळा येथे शिवभाेजन थाळी केंद्र सुरू केल्यास अनेक गरीब, वंचित नागरिकांची जेवणाची साेय हाेईल असे म्हटले आहे.
विक्रांत हटकर यांना ब्लॅक बेल्ट प्रदान
नांदेड : येथील विक्रांत केशवराव हटकर यांना तायक्वांदाे असाेसिएशन ऑफ नांदेडच्यावतीने मुख्य प्रशिक्षक बालाजी जाेगदंड यांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला. हटकर यांची मास्टर तायक्वांदाे मार्शल आर्ट स्कूलच्या प्रमुख प्रशिक्षकपदीही निवड केल्याचे जाेगदंड यांनी घाेषित केले. गुरुपाैर्णिमेनिमित्त हा कार्यक्रम झाला.