श्रीक्षेत्र माहूर: तालुक्यातील आनमाळ येथील वृद्ध शेतकऱ्याचा लाकडी दांडयाने डोक्यात मारुन खून करण्यात आल्याची घटना १५ मार्च रोजी घडली. या घटनेची फिर्याद २३ मार्च रोजी देण्यात आल्याचे पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.अनमाळ येथील शेतकरी माधव यादव साखरे (वय ६५) यांच्या पत्नीच्या नावावर असलेली साडे सहा एकर कोरडवाहू जमीन शेत सर्वे क्र २५ वाहिती करून उदरनिर्वाह करत होते अनेक वर्षापासून शेजारी राहत असलेले रामा योगाजी बरडे (वय ८०) यांना शेतातील आंब्याची चार झाडे व शेत उत्पनातील अर्ध्या नफ्यावर देत होते. यावर्षी आंब्याना चांगला बहर आल्याने दोघे शेतातच झोपत होते.१५ रोजी शेतात दोघांत वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर भांडणात होऊन साखरे यांनी हातातील लाकडी दांड्याने बरडे यांच्या डोक्यात पाठीत अनेक वार केले.या मारहाणीत बरडे जागीच बेशुद्ध पडले. साखरे हे घरी निघून गेले. रस्त्याने जाणाऱ्यांनी बरडे यांना माहुरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, येथील डॉ. व्ही.एन. भोसले यांनी नागपूर येथे त्यांना हलविण्याची सूचना केली. उपचारादरम्यान बरडे यांचा २३ रोजी मृत्यू झाला.सून लक्ष्मीबाई बरडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला. पोनि लक्ष्मण राख यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार शरद घोडके, जमादार गंगाधर कपाटे, पोकॉ देशमुख, बट्टेवार तपास करीत आहेत. आरोपीला अटक करण्यात आली.
लाकडी दांड्याने मारून वृद्धाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:39 AM
तालुक्यातील आनमाळ येथील वृद्ध शेतकऱ्याचा लाकडी दांडयाने डोक्यात मारुन खून करण्यात आल्याची घटना १५ मार्च रोजी घडली. या घटनेची फिर्याद २३ मार्च रोजी देण्यात आल्याचे पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.
ठळक मुद्देमाहूर तालुक्यातील आनमाळ येथे किरकोळ वादातून घडली घटना