अपघातात एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:08 AM2021-02-05T06:08:34+5:302021-02-05T06:08:34+5:30
शॉर्टसर्कीटने आग कंधार - शहरातील बौद्ध द्वारबेस भागातील चार दुकाने शॉर्ट सर्कीटमुळे जळून खाक झाली. यात ४० ते ५० ...
शॉर्टसर्कीटने आग
कंधार - शहरातील बौद्ध द्वारबेस भागातील चार दुकाने शॉर्ट सर्कीटमुळे जळून खाक झाली. यात ४० ते ५० लाखांचे नुकसान झाले. महंमद रियाज महंमद बशीर यांचे गीफ्ट सेंटर, रुक्सार तबस्सुम यांचे जनरल स्टोअर्स, शेख कलीम शेख जलाल यांचे बांगड्याचे दुकान, रामेश्वर बनसोडे यांचे गीफ्ट सेंटर, शेखनबी शेख महबुब यांचे पादत्राणाचे दुकान, शेख अफसर शेख नबी यांचे पादत्राणे आणि महंमद वसीम अजीमोद्दीन यांचे बांगड्याचे दुकान आदी जळाले. सोमवारी रात्री ही घटना घडली. तहसीलदार व्यंकटेश मुंडे, जि.प. सदस्या प्रणिता चिखलीकर, सामाजिक कार्यकर्त्या आशा शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली.
झोपडीला आग
मुदखेड - येथील एका सालगड्याच्या शेतझोपडीला आग लागून झोपडीचे नुकसान झाले. यात सालगड्याचा संसार उघड्यावर पडला. मुदखेड येथून जवळ असलेल्या गट क्रमांक २६५ मधील दीपक चक्रवार यांच्या शेतात गजानन सोळंके हे सालगडी आहेत. २५ जानेवारी रोजी दुपारी सोळंके यांच्या झोपडीला आग लागली.
घंटागाडीची बॅटरी लंपास
लोहा - उस्माननगर येथील ग्रामपंचायतीच्या घंटागाडीमधील बॅटरी चोरीस गेल्याची घटना २६ जानेवारी रोजी घडली. ग्रामसेविका श्रीमती शिंदे यांनी या प्रकरणी तक्रार दिली. यापूर्वी ग्रामपंचायतमधील सौरदिव्यांची बॅटरी, हातपंपाचे पाईप, संगणक चोरीस गेले होते.
सर्वसाधारण सभा आॅनलाईन
बिलोली - येथील पालिकेची सर्वसाधारण सभा आॅनलाईन घेण्यात येणार आहे. या सभेत अग्नीशमन वाहन खरेदीसह ४५ विषय आहेत. नगराध्यक्ष मारोती पटाईत सभेच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
जमदाडे यांची निवड
नायगाव - नायगाव येथील प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारीपदी महेश जमदाडे यांची निवड झाली. त्यांनी सोमवारी बिलोलीत पदभार स्वीकारला. बिलोलीचे तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी त्यांचे स्वागत केले.
धनादेश वितरण
कुंडलवाडी - पंतप्रधान घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना चौथ्या हप्त्याचे धनादेश नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार यांच्या हस्ते देण्यात आले.या योजनेेअंतर्गत १३०४ घरकुलांना मंजुरी मिळाली. यापैकी ३६७घरकुलांना बांधकाम करण्यास परवानगी देण्यात आली. यापैकी १२० घरकुलांचे काम पूर्ण झाले. कार्यक्रमाला नगरसेवक सुरेश कोंडावार, शंकर गोनलेवार, शैलेष ऱ्याकावार, मुक्तार शेख, सचिन कोटलवार, गंगाधरराव खेळगे आदी उपस्थित होते.
शेख अकबर यांना पदोन्नती
मांडवी - येथील चालक शेख अकबर शेख मुनवर यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती मिळाली. त्यानिमित्त सपोनि संतोष केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक शिवप्रसाद कऱ्हाळे, सहाय्यक फौजदार विजय कोळी, जमादार वैजनाथ मोटरगे यांनी त्यांचा सत्कार केला.
शाखाधिकारीपदी रत्नागिरे
कुंडलवाडी - नांदेड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या कुंडलवाडी शाखेचे शाखाधिकारी म्हणून सत्यनारायण रत्नागिरे रूजू झाले आहेत. यापूर्वीचे जी.डी.कदम यांची धर्माबाद येथे बदली झाली. दरम्यान रत्नागिरे यांचा कुंडलवाडी शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सत्कार केला.