स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी शेतीपूरक जोडधंदे, व्यवसाय करावेत : निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:18 AM2021-01-23T04:18:10+5:302021-01-23T04:18:10+5:30

मारोती फाटा, ता. हिमायतनगर येथे राष्ट्रमाता जिजाऊ माती व पाणी परीक्षण केंद्र, लिंगापूर आयोजित राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व शिवजयंतीनिमित्त ...

In order to survive in the age of competition, agribusiness should be done: Nivruti Maharaj Deshmukh Indurikar | स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी शेतीपूरक जोडधंदे, व्यवसाय करावेत : निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर

स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी शेतीपूरक जोडधंदे, व्यवसाय करावेत : निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर

googlenewsNext

मारोती फाटा, ता. हिमायतनगर येथे राष्ट्रमाता जिजाऊ माती व पाणी परीक्षण केंद्र, लिंगापूर आयोजित राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व शिवजयंतीनिमित्त कीर्तन झाले. यावेळी त्यांनी प्रबोधनपर विचार मांडले.

इंदुरीकर यांनी परिसरातील उपस्थित नागरिकांना संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या जीवन कार्याविषयी तसेच राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन करून रयतेच्या कल्याणासाठी जी कामे केलीत ,त्या कामाची आज आपल्या समाजाला गरज आहे. त्यामुळे आजच्या युवकांनी व्यसन करून आपलं आयुष्य बरबाद करू नये, व्यसनाधिनता, टवाळखोरपणा, कामचुकारपणा करून आपल्या आयुष्यामध्ये दिवाळखोरीच लक्षणे आणू नयेत, त्यासाठी सर्वांनी जे मिळेल ते काम करून आयुष्यात प्रगती साधली पाहिजे, आपल्या जमिनीचे माती परीक्षण करूनच यापुढील काळात शेती करावी, सेंद्रिय शेती करावी, यावेळी त्यांनी आजच्या तरुणांना चांगले धडे देऊन तब्बल दोन तास कीर्तनाच्या माध्यमातून उपस्थित नागरिकांचे प्रबोधन केले.

यावेळी आयोजक तथा राष्ट्रमाता जिजाऊ माती परीक्षण केंद्राचे संचालक भागवत देवसरकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका विशद करून निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे स्वागत केले. यशस्वीतेसाठी सुनील देवसरकर, संतोष देवसरकर, सुधाकर पवळे, पवन सूर्यवंशी, नंदू पाटील, महेश गोरेगावकर, अविनाश देवसरकर, गजानन देवसरकर, अनिल देवसरकर, आकाश कवडे, संदीप कवडे, अविनाश कदम, विलास माने, भगवान कदम यांच्यासह गावातील तरुणांनी, राष्ट्रमाता जिजाऊ माती परीक्षण केंद्राचे कर्मचारी, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: In order to survive in the age of competition, agribusiness should be done: Nivruti Maharaj Deshmukh Indurikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.