ऑनलाईन कामकाजासाठी कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपसह इतर साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:22 AM2021-07-07T04:22:54+5:302021-07-07T04:22:54+5:30

कृषी विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील), राष्ट्रीय कृषी विकास ...

Other materials including laptops to agricultural officers for online work | ऑनलाईन कामकाजासाठी कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपसह इतर साहित्य

ऑनलाईन कामकाजासाठी कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपसह इतर साहित्य

Next

कृषी विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील), राष्ट्रीय कृषी विकास योजना (अनुसूचित जाती व जमाती), तसेच नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रम, जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधून घेण्यात येणाऱ्या योजना, खरीप व रब्बी हंगामपूर्व नियोजनादरम्यान रासायनिक खते, बियाणे, कीटकनाशक औषधी इत्यादीची मागणी नोंदविणे त्यांचा पुरवठा झाल्याची खात्री करणे, कृषी सेवा केंद्राची तपासणी करणे, पंचायत समितीस्तरावर सर्व कृषी अधिकारी यांना ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्याची नोंदणी करणे, त्यांची निवड करणे व त्यांना प्रत्यक्षात लाभ देणे इत्यादी कामे करावी लागतात. तसेच वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने जिल्हास्तरावरुन, विभागस्तरावरुन व राज्यस्तरावरुन होणाऱ्या बैठकीस उपस्थित राहावे लागते. या सर्व कामांचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या आढावा बैठकीत जिल्हास्तरावर द्यावा लागतो. तेव्हा कृषी विभागाचे काम अधिक गतिमान होण्यासाठी कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी सर्व कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉप, स्कॅनर व प्रिंटर इत्यादी साहित्‍याचे वाटप केले. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री भोसले, प्रभारी मोहीम अधिकारी गजानन हुंडेकर, प्रभारी जिल्हा कृषी अधिकारी व्ही. जी. अधापुरे, कृषी अधिकारी नियोजन पी. आर. माने, कनिष्ठ सहायक लेखा राम कवडे, चंद्रवंशी, हाळे, कासराळीकर यांच्यासह जिल्ह्यातील कृषी अधिकारी उपस्थित होते. या उपक्रमासाठी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुलकर्णी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी रावसाहेब कोलगणे़, कृषी विकास अधिकारी संतोष नादरे यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे.

Web Title: Other materials including laptops to agricultural officers for online work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.