पार्डी : अर्धापूर तालुक्यातील देळूब बुग़ावाला जोडणारा पूल गेल्या काही वर्षांपासून मोडकळीस आल्याने पुलाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती़ पार्डी-देळूब बु़, देळूब खु़, भोगाव या गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे़ हा पूल पावसाळ्याअगोदर वाहतुकीसाठी खुला होणार आहे़ हा पूल पावसाळ्यात देळूब बु़, देळूब खु़, भोगाव व पार्डी परिसरातील शेतकऱ्यांना मालाची ने-आण करण्यासाठी सोयीस्कर होणार आहे़देळूब गावाला जोडणारा पूल मोडकळीस आलेला होता़ पावसाळ्यात हा पूल वाहून जाण्याची शक्यता वर्तवली जात होती़ पुलावर सुरक्षेसाठी कठडे नसल्याने या पुलावर नेहमीच अपघात होत होते़ तसेच पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पुराचे पाणी पुलावरून वाहत होते़ त्यामुळे पावसाळ्यात वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती़ या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने या पुलावरील दळणवळण व्यवस्था संपूर्ण ठप्प होत होती़देळूब गावाच्या पुलावरून शेतकºयाच्या मालाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने पावसाळ्यात शेतकºयांना अनेक गोष्टींचा अडथळा निर्माण होत होता़ तसेच या गावांना दुसरा मार्ग नसल्याने हाच पूल नागरिकांसाठी जाण्या येण्यासाठी होता़ त्यामुळे या पुलावर नेहमीच वर्दळ राहत असे़ परंतु, हा पूल संपूर्ण मोडकळीस आल्याने गावकरी, शेतकरी व विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत असे़या पुलाच्या बांधकामासाठी गावकºयांनी व विद्यार्थ्यांनी वेळोवेळी मागणी करून केली होती़ शासनाने देळूब पुलाच्या बांधकामाची परवानगी दिली होती़ या पुलाचे बांधकाम जानेवारी महिन्यात सुरु झाले होते़ पुलाचे बांधकाम पूर्ण प्रगतीपथावर सुरू आहे़ पुढील महिन्यात पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी कामगार रात्रं-दिवस काम करीत आहे़ दरम्यान, इसापूर धरणातून महिन्याच्या अंतराने पार्डी नदीला पाणी सोडण्यात येत असल्याने बाधकामास व्यत्यय येत असून पुलाच्या बांधकामास उशीर होत असल्याचे सांगितले जात आहे़पुलाचे बांधकामुळे देळूब बु़, देळूब खु़, भोगाव व पार्डी शिवारातील शेतकºयांना दिलासा मिळणार आहे़ या पुलाच्या बांधकामुळे पावसाळ्यात होणाºया अनेक अडचणीचा सामना करावा लागणार नाही़ विद्यार्थ्यांसाठी हा मार्ग सोयीस्कर पडेल़ देळूब ,भोगाव येथील जि़ प़ शाळा नावालाच असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते़ पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू लागले होते़ परंतु, पुलाचे बांधकाम केल्याने विद्यार्थ्यांना हा मार्ग सोयीस्कर होणार आहे.एकमेव पूलदेळूबच्या पुलावरून शेतकºयाच्या मालाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते, मात्र पावसाळ्यात अडचणीचा समना करावा लागत होता़ या गावांना दुसरा मार्ग नसल्याने हा पूल एकमेव होता़ त्यामुळे पुलावर नेहमीच वर्दळ राहत असे़ पूल संपूर्ण मोडकळीस आल्याने गावकरी, शेतकरी व विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असे़पुलामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची होणार सोयपुलाचे बांधकामामुळे देळूब बु़, देळूब खु़, भोगाव व पार्डी शिवारातील शेतक-यांना दिलासा मिळणार आहे़ या पुलाच्या बांधकामामुळे पावसाळ्यात होणा-या अनेक अडचणीचा सामना करावा लागणार नाही़ विद्यार्थ्यांसाठी हा मार्ग सोयीस्कर पडेल़ पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना बाहेरगावी जावे लागते़ परंतु, पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू लागले होते़ परंतु, या पुलाचे बांधकाम केल्याने विद्यार्थ्यांना हा मार्ग सोयीस्कर होणार आहे़
पार्डी-देळूब पुलामुळे होणार शेतकऱ्यांची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 12:03 AM
अर्धापूर तालुक्यातील देळूब बुग़ावाला जोडणारा पूल गेल्या काही वर्षांपासून मोडकळीस आल्याने पुलाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती़ पार्डी-देळूब बु़, देळूब खु़, भोगाव या गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे़
ठळक मुद्देपावसाळ्यापूर्वी वाहतुकीसाठी खुला होणार पूल