गुजरी येथे मागील अनेक वर्षाची परंपरा असलेला अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिभावाने २४ डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. हरिनाम सप्ताहात रोज पहाटे चार ते सकाळी सहा काकडा, सकाळी सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी दहा ते दुपारी बारा तुकाराम गाथाभजन, सायंकाळी सहा ते सात हरिपाठ व रोज रात्री नऊ ते अकरा कीर्तन व तद्नंतर हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. येथील विठ्ठल रुक्मिणी व हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सहाव्या वाढदिवसाच्या अनुषंगाने सदर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहातील कीर्तन याप्रमाणे- २४ डिसेंबर रोजी वासुदेव महाराज कोलंबीकर,२५ श्रीधर महाराज कासराळीकर, २६ रोजी वैभव महाराज गुजरीकर, २७ रोजी अनंत महाराज हिवरेकर, २८ रोजी मधुसूदन महाराज कापसीकर, २९ रोजी योगेश महाराज अग्रवाल वसमत, ३० रोजी गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर, ३१ रोजी भगवताचार्य योगेश महाराज गवंडगांवकर या नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा होणार आहे. सर्व भक्तांनी कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन सप्ताह कमिटी व ग्रामस्थांनी केले आहे.
गुजरीत अखंड हरिनाम सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 4:17 AM