बारावी निकालात नांदेड जिल्ह्याची टक्केवारी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:33 AM2018-05-31T00:33:41+5:302018-05-31T00:34:02+5:30

इयत्ता १२ वी परीक्षेचा आॅनलाईन निकाल ३० मे रोजी दुपारी एक वाजता घोषित झाला. यंदा जिल्ह्याची टक्केवारी वाढली असून ८९.३४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ गतवर्षी जिल्ह्याची बारावीची टक्केवारी ८८.५४ तर २०१६ मध्ये ८४.९९ टक्के इतका लागला होता. निकालात उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात ०़०८ टक्क्यांनी वाढ झाली असून यंदाही मुलांपेक्षा मुलीच सरस ठरल्या आहेत़

The percentage of Nanded district increased in the XII result | बारावी निकालात नांदेड जिल्ह्याची टक्केवारी वाढली

बारावी निकालात नांदेड जिल्ह्याची टक्केवारी वाढली

googlenewsNext
ठळक मुद्देयंदा ८९.३४ टक्के तर गतवर्षी ८८.५४ टक्के निकाल

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : इयत्ता १२ वी परीक्षेचा आॅनलाईन निकाल ३० मे रोजी दुपारी एक वाजता घोषित झाला. यंदा जिल्ह्याची टक्केवारी वाढली असून ८९.३४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ गतवर्षी जिल्ह्याची बारावीची टक्केवारी ८८.५४ तर २०१६ मध्ये ८४.९९ टक्के इतका लागला होता. निकालात उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात ०़०८ टक्क्यांनी वाढ झाली असून यंदाही मुलांपेक्षा मुलीच सरस ठरल्या आहेत़
यावर्षी ३३ हजार ५२० विद्यार्थ्यांनी बारावीची नियमित परीक्षा दिली. यामध्ये २९ हजार ९४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८९.३४ टक्के एवढे आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी नियमित उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ०.०८ टक्क्यांनी वाढले आहे. तर पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मात्र घटले आहे़
नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ७६ परीक्षा केंद्रांवर २१ फेबु्रवारी ते ३ मार्च या कालावधीत १२ वी ची परीक्षा घेण्यात आली. एकूण ३५ हजार ५२० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती़ यामध्ये १६ हजार ८२४ विद्यार्थी व १३ हजार १२२ विद्यार्थिनींचा समावेश होता. मागील वर्षीप्रमाणेच यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असून मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.९७ टक्के इतके आहे. दरम्यान, विज्ञान शाखेच्या १४ हजार ४१३ विद्यार्थ्यांपैकी १३ हजार ८४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेतून १५ हजार ५४ परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी १२ हजार ४५५ तर वाणिज्य शाखेतील ३ हजार २६६ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
---
सर्वच शाखेतील उत्तीर्ण होण्याचा टक्का वाढला
जिल्ह्यातील विज्ञान शाखेतील नियमित विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९६.१५ टक्के असून गतवर्षी या शाखेचा निकाल ९५.५१ टक्के इतका होता. तसेच वाणिज्य शाखेचा निकाल यंदा ९२.१० टक्के इतका असून गतवर्षी शाखेचा निकाल हा ९१.६१ टक्के इतका होता. तर कला शाखेचा निकाल ८२.७४ टक्के इतका लागला आहे.त्यावरुन यंदा निकालाचा टक्का वाढला आहे.
मुली राहिल्या अव्वल स्थानी
जिल्ह्यातील ३३ हजार ६१३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. ज्यामध्ये ३३ हजार ५२० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून २९ हजार ९४६ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८९.३४ टक्के इतके राहिले. तर यंदा उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारीत विद्यार्थिनी अव्वलस्थानी राहिल्या आहेत. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.९७ टक्के इतके राहिले.
---
लोह्यात तिन्ही शाखेत मुलीच अव्वल !
लोहा : यंदाही लोहा तालुक्यातील महाविद्यालयात बारावीच्या तिन्ही शाखेत मुलींनी आपले वर्चस्व कायम ठेवत बाजी मारली. कला शाखेत प्रथम लोहा शहरातील संत गाडगे महाराज महाविद्यालयाची शिल्पा पवार (८५़३८) प्रथम, सीमा सोनवळे (८४) द्वितीय, तर शालीनी सोनवळे (८४़१५) ही तृतीय आली. वाणिज्य शाखेत शहरातील संत गाडगे महाराज महाविद्यालयाची पल्लवी संतोष पवार (९०़७६) प्रथम, आरती पवार (८८़९२) द्वितीय, प्रल्हाद यरमुरे (८८़३०) तृतीय आले. विज्ञान शाखेत पानभोसीच्या प्रियदर्शनी महाविद्यालयाचा अविनाश हालगे (८४ टक्के) प्रथम, लोहा शहरातील संत गाडगे महाराज महाविद्यालयाची दीप्ती सोनवळे (८१़८४) द्वितीय तर प्रदीप गायकवाड (८१़६९) हा तृतीय आला. गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी, पालक, शिक्षक आदींनी कौतुक केले.
---
देगलूर तालुक्याचे विद्यार्थी चमकले
लोकमत न्यूज नेटवर्क
देगलूर: : देगलूर शहर व ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक विद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन यांचा इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल यावर्षी अतिशय चांगला लागल्याचे दिसत आहे. कनिष्ठ महाविद्यालयनिहाय निकालाची टक्केवारी अशी-
देगलूर महाविद्यालय - ८९.२२, मानव्य विकास विद्यालय - ८४.२१, श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय देगलूर - ९६.२०, मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू उच्च माध्यमिक विद्यालय देगलूर - ९१.४२, वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय देगलूर - ९७.३९, कै.इंदिराबाई देशमुख कनिष्ठ महाविद्यालय हणेगाव - ७३.५२, पोस्ट बेसिक आश्रम कनिष्ठ महाविद्यालय शिळवणी बॉर्डर तांडा - ७६.५९, महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालय नरंगल - १००, श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय मरखेल - ९३.८८, लालबहादूर शास्त्री उच्च माध्यमिक विद्यालय वझर - ५७.१४, शासकीय तंत्रनिकेतन देगलूर - ९१.६६, उच्च माध्यमिक आश्रमशाळा शिळवणी - ७२.४१, जनजागृती उच्च माध्यमिक विद्यालय लिंगनकेरूर -३३.३३ टक्के.
---
अर्धापूर तालुक्याचा ८८ टक्के निकाल
लोकमत न्यूज नेटवर्क
ंअर्धापूर : : तालुक्याचा बारावीचा निकाल ८८ टक्के लागला असून मेंढला बुद्रुक येथील निर्मल कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून या विद्यालयाच्या विज्ञान शाखेचे सर्वच्या सर्व १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यात सहा कनिष्ठ महाविद्यालये असून या विद्यालयातील ७८३ विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी नाव नोंदविली होती. तालुक्यातील ६९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८८़६३ टक्के आहे़ यात विशेष प्रावीन्यासह ८१, प्रथम श्रेणी ३४२, द्वितीय श्रेणी २५९, उत्तीर्ण श्रेणी १२ असे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लहान येथे कै. दिगंबरराव देवडे महाविद्यालयच्या विज्ञान शाखेच्या ७६ पैकी ७४ विद्यार्थी उत्तीर्ण, कला शाखेच्या ५० पैकी ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेचे सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

Web Title: The percentage of Nanded district increased in the XII result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.