अनुभूती शिबिरातून व्यक्तिमत्त्व विकास घडतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:01 AM2019-05-20T00:01:10+5:302019-05-20T00:02:04+5:30

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवर काम करण्यात येते़ त्याअनुषंगाने आयोजित केले जाणारे अनुभूती शिबीर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारे असते, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी यांनी केले़

Personality development takes place from the experience camp | अनुभूती शिबिरातून व्यक्तिमत्त्व विकास घडतो

अनुभूती शिबिरातून व्यक्तिमत्त्व विकास घडतो

Next
ठळक मुद्देस्वारातीम विद्यापीठाचे कुलसचिव रमजान मुलानी यांचे प्रतिपादन

नांदेड : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवर काम करण्यात येते़ त्याअनुषंगाने आयोजित केले जाणारे अनुभूती शिबीर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारे असते, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी यांनी केले़
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे अनुभूती शिबीर- संवाद ग्रामीण भागाचा सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळ येथे तीन दिवशीय शिबीर झाले. शिबिराच्या समारोप कार्यक्रमात डॉ़ रमजान मुलाणी बोलत होते़ यावेळी संस्कृती संवर्धन मंडळाचे व्यवस्थापक अभिजित महाजन, मुख्याध्यपक संभाजी गायकवाड, नाना वाघमोडे अभाविप विभाग संघटनमंत्री, जिल्हा सहसंयोजक शुभम नार्तावार यांची प्रमुख उपस्थिती होती. विभाग संघटनमंत्री नाना वाघमोडे यांनी आगामी कार्यक्रमाची घोषणा केली़ यावेळी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक हजार वृक्ष गोदावरी नदीच्या काठावर लावणार असल्याचे सांगितले़ अभाविप स्थापना दिनानिमित्त जिल्ह्यात सर्व ठिकाणी रक्तदान शिबीर घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले़
या शिबिराची सुरुवात या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक डॉ. सुधीर कोकर यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद देशमुख, मेजर बालाजी सूर्यवंशी, सुनील देशमुख, सरपंच सुजाता सिडनोड, प्रदेश सहमंत्री अंकिता कामटीकर, शिबीरप्रमुख नरेश यनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती़ दरवर्षी अभाविप एक थीम ठरवत असते. यावर्षी भारत गौरव ही संकल्पना घेऊन वर्षभर काम करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या शिबिरामध्ये उभारता भारत नई दिशाये या विषयावर डॉ. रामचंद्र मंठाळकर यांनी मांडणी केली. यावेळी त्यांनी भारतातील परंपरा यांची मांडणी केली.
ग्रामविकास संकल्पना हा विषय दीपक मोरताळे यांनी मांडला. भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपले गाव हे विकसित कोणत्या मागाने होईल ते त्यांनी सांगितले.
जनजागृतीपर मार्गदर्शन
पाणी व्यवस्थापन कसे करावे या विषयी सखोल मार्गदर्शन व चर्चा झाली. नागदरवाडी येथे पाणी विषयासाठी ज्यांनी आयुष्य घातले ते बाबूराव केंद्रे यांनी घेतले. पाण्याविषयी जनजागृती व महत्त्व लोकांना पटवून दिले.

Web Title: Personality development takes place from the experience camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.