कॉफी शॉपवर पोलिसांचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 01:06 AM2019-02-13T01:06:11+5:302019-02-13T01:06:40+5:30

शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात कॉफी शॉप उघडण्यात आले असून यामध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणींच्या अश्लील प्रकारास प्रोत्साहन देण्यात आले़ ही बाब काही पालकांनीही पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली आहे़

Police Watch on the Coffee Shop | कॉफी शॉपवर पोलिसांचा वॉच

कॉफी शॉपवर पोलिसांचा वॉच

Next

नांदेड : शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात कॉफी शॉप उघडण्यात आले असून यामध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणींच्या अश्लील प्रकारास प्रोत्साहन देण्यात आले़ ही बाब काही पालकांनीही पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली आहे़ त्यानंतर आता या कॉफी शॉपची संबंधित हद्दीतील पोलीस निरीक्षक तपासणी करणार असून काही आक्षेपार्ह आढळल्यास त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अभिजित फस्के यांनी दिली़
शहरातील पावडेवाडी, कौठा, आनंदनगर परिसरात यापूर्वी कॉफी शॉपवर धाडी टाकून अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते़ तसेच अशा कॉफी शॉपच्या विरोधात कारवाई करण्यात आली होती़ परंतु, त्यानंतरही लपूनछपून कॉफी शॉपमध्ये हे प्रकार सुरुच आहेत़ वाडी ग्रामपंचायतने अशा पंधरा कॉफी शॉपचालकांचे परवाने रद्द केले होते़ त्यानंतर कॉफी शॉप चालकांनी मनपा हद्दीत आपला मोर्चा वळविला होता़
दोन दिवसांवर आलेल्या व्हॅलेंटाईन डे निमित्त कॉफी शॉप चालकांनी जय्यत तयारी केली आहे़ त्यासाठी वेगवेगळ्या आॅफर दिल्या आहेत़ महाविद्यालयीन तरुण-तरुणी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने फसवणूक करणाºयांच्या जाळ्यात ओढल्या जावू नये यासाठी पोलिसांची गस्त सुरु राहणार आहे़ तसेच अशा कॉफी शॉपवर आता पोलिसांचा ‘वॉच’ राहणार आहे़ त्या-त्या हद्दीतील पोलीस निरीक्षक हे अशा कॉफी शॉपची तपासणी करणार आहेत़ त्यामध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे़ त्याचबरोबर महाविद्यालय व खाजगी कोचिंग क्लासेसच्या परिसरात बुलेट व इतर दुचाकीवरुन हुल्लडबाजी करणा-यांनाही जरब बसावी यासाठी या परिसरात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत़, असेही उपअधीक्षक फस्के म्हणाले़
विसावा उद्यानातही गस्त
दोन दिवसांपूर्वीच विसावा उद्यानात मुलींची छेड काढताना रोखणा-या सुरक्षा रक्षकाला एका टोळक्याने मारहाण केली होती़ या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस कारवाई करीत आहेत़या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून उद्यानाच्या बाहेर व आतमध्ये पोलिसांची गस्त असणार आहे़ बीट मार्शल व इतर कर्मचाºयांचा त्यात समावेश असणार असल्याचेही फस्के म्हणाले़

Web Title: Police Watch on the Coffee Shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.