आरळीत ग्रामपंचायत निवडणुकीचे राजकारण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:17 AM2020-12-24T04:17:06+5:302020-12-24T04:17:06+5:30

मागील आरक्षण सोडत राज्य सरकारने रद्द केल्याने अनेकांचा हिरमोड आरळी : आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरळीत युवकांचे व गावपुढाऱ्यांचे राजकारण ...

The politics of Gram Panchayat elections heated up in Arali | आरळीत ग्रामपंचायत निवडणुकीचे राजकारण तापले

आरळीत ग्रामपंचायत निवडणुकीचे राजकारण तापले

Next

मागील आरक्षण सोडत राज्य सरकारने रद्द केल्याने अनेकांचा हिरमोड

आरळी : आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरळीत युवकांचे व गावपुढाऱ्यांचे राजकारण तापले असून, भावी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या उमेदवारी निवडीबाबत चाचपणीला सुरुवात झाली आहे.

बिलोली तालुक्यात सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर रणधुमाळीस सुरुवात झाली होती. त्यातच राज्य सरकारने सरपंच पदाचे आरक्षण रद्द केल्याने अनेकांचा हिरमोड झाला असला तरी ग्रामपंचायत सदस्यांसाठी रस्सीखेच चालूच आहे. तालुक्यातील आरळीचे सरपंच पद आरक्षण सोडतीत ओबीसी महिलेला सुटले होते. पण शासनाच्या नवीन निर्णयानुसार ते रद्द झाले. सदर आरक्षण लागू राहिले असते तर अनेकांना सरपंच पदाचे डोहाळे लागले होते. गावातील एकमेकांचे संबंध व जातीय समीकरण यावर बऱ्याच गोष्टी गावपातळीवर अवलंबून असतात. त्यादृष्टीने पॅनल उभे केले जात आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत एकमेकांच्या विरोधी प्रचार करणारे आपआपले गटतट बाजूला ठेवून पॅनल तयार करत असल्याचे पहावयास मिळत आहे. भर थंडीत प्रचार गरमावत आहे, अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहेत. पण आरळीकर नेमके आपले अमूल्य मत कोणाच्या पारड्यात टाकतील हे सांगणे पण तेवढेच कठीण असले तरी एकंदरीत या वेळेसची ग्रामपंचायत तरुणांच्या ताब्यात देण्याकडे आरळीकरांचा कल दिसत आहे. परंतु आजपर्य॔ंत येथील सत्तेचा डौलारा येथील मातब्बर राजकारण्यांच्याच बाजूने राहिला आहे. सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर सुटत असले तरी येथील गावपुढाऱ्यांत व नव तरुणात निवडणुकीचा रंग चांगलाच भरलाय, गावपातळीवर उमेदवार व मतदार जुळवणीच्या कामात पॅनल प्रमुख व उमेदवार यांचे युद्धपातळीवर काम चालू असून ज्येष्ठ राजकारणी, मागील सत्ताधारी व नवतरुण अशी तिरंगी लढत लागण्याची दाट शक्यता आहे. येथील ग्रामपंचायत चांगलीच चुरशीची व रंगतदार ठरण्याची शक्यता दिसत आहे. ज्येष्ठ राजकारणी पुढाऱ्यांच्या, यापूर्वी सत्तेत असणाऱ्यांच्या की नव तरुणांच्या गळ्यात विजयाची माळ पडेल हा येणारा काळ ठरविणार आहे.

Web Title: The politics of Gram Panchayat elections heated up in Arali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.