नांदेड : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व ‘सृजन’ च्या वतीने आयोजित डिपेक्स- २०१९ मध्ये संख्यात्मक, गुणात्मक आणि संशोधनात्मक या त्रिसूत्रीचे दर्शन घडले, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केले.डिपेक्स २०१९ चा समारोप व बक्षीस वितरण समारंभ श्री गुरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णूपुरी यांच्या मैदानावर मंगळवारी पार पडला. या प्रसंगी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, अभाविपचे राष्टÑीय सहसंघटन मंत्री जी.लक्ष्मण, तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक महेश शिवणकर, डिपेक्स २०१९ चे नियंत्रक प्रणव गुरव, समन्वयक विजय पाटील, प्रा. सरिता बोलशेटवार, अभाविपच्या महानगर अध्यक्षा प्रा.गीता सांगवीकर, महानगर मंत्री गणेश बोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. कुलगुरू डॉ. भोसले म्हणाले, आपण डीपेक्स प्रदर्शनीला भेट दिली. त्यातून आपल्याला तीन महत्त्वाच्या गोष्टी निदर्शनास आल्या. त्या म्हणजे, प्रकल्पांची संख्या, गुणवत्ता आणि आजच्या समाजाला उपयोगी असणारे संशोधन. विद्यार्थ्यांमधील अभिनव आणि भन्नाट कल्पना या प्रकल्पामधून समाजासमोर येतात ही चांगली गोष्ट आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे व अभाविप, डीपेक्स संयोजकचे मनापासून कौतुक करावेसे वाटते, हे प्रकल्प समाजातील विविध घटकांच्या उपयोगासाठी कसे आणले जातील याकडे लक्ष द्यावे.सहसंचालक महेश शिवणकर म्हणाले की, गेल्या तीस वर्षांपासून मी देखील डीपेक्सशी निगडित आहे. दरवर्षीच्या डिपेक्समधून नवनवीन संकल्पना समोर येत आहेत आणि अशा डिपेक्समधून पुढे आलेल्या उद्योजकांची संख्या मोठी आहे. यांचा आनंद वाटतोय. डिपेक्समधून आयडिया इनोव्हेशन, अप्रिसिएशन आणि इम्प्लिमेंटेशन या ठळक बाबी लक्षात आल्या आहेत.मानवी मर्यादा लक्षात घेता कृषीसह विविध क्षेत्रांत नवतंत्रज्ञानचा वापर काळाची गरज आहे. यावेळी शिवणकर यांनी डीटीईचे संचालक डॉ. अभय वाघ यांचा शुभेच्छासंदेश वाचून दाखविला. जी. लक्ष्मण म्हणाले, महाराष्ट्राच्या डिपेक्समुळे संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या विद्याशाखांचे उपक्रम सुरू झाले आहेत तसेच यातून अनेक क्षेत्रात नवोपक्रम राबविणारे, उद्योजक, संशोधक, शास्त्रज्ञ कार्यरत आहेत.पाहुण्यांचा परिचय अजय मेहते यांनी करून दिला तर प्रास्ताविक नियंत्रक विजय पाटील यांनी केले. तंत्रशिक्षण विद्यार्थी परिषदच्या उपक्रमाची माहिती प्रा. सरिता बलशेटवार यांनी दिली. महानगरमंत्री गणेश बोडके यांनी आभार मानले.केतकी कोळेश्वर यांच्या वंदे मातरम् गीतानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. डिपेक्समधील सर्वसाधारण विजेतेपद अंकुश शिक्षण संस्था नागपूरच्या जी. एच. रायसोनी पॉलिटेक्निकने पटकावले.
‘डिपेक्स’मध्ये गुणवत्तेचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 12:30 AM
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व ‘सृजन’ च्या वतीने आयोजित डिपेक्स- २०१९ मध्ये संख्यात्मक, गुणात्मक आणि संशोधनात्मक या त्रिसूत्रीचे दर्शन घडले, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केले.
ठळक मुद्देसमारोप : प्रकल्प समाजातील विविध घटकांसाठी उपयुक्त-कुलगुरु उद्धव भोसले