किनवट : तळ्याच्या काठावर असलेल्या शेतात कापूस वेचणी करणाऱ्या ३२ वर्षीय महिलेवर रानडुक्कराने हल्ला चढवून जखमी केले. ही घटना २४ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता किनवट तालुक्यातील निचपूर शिवारात घडली़ जखमी महिलेवर साने गुरुजी रुग्णालयात डॉ़ अशोक बेलखोडे यांनी उपचार केले़निचपूर ता़ किनवट येथील यशवंत केंद्रे यांचे तळ्याच्या काठावर शेत आहे़ शेतात कापूस पीक आहे़ कापसाची मजुरीने वेचणी करणाऱ्या अलकाबाई रामेश्वर नागरगोजे या महिलेवर रानडुक्कराने अचानक हल्ला केला़ या हल्ल्यात अलकाबाई नागरगोजे या जखमी झाल्या़ शेतात असलेल्या एका महिलेने व एका मुलाने आरडाओरडा करून डुक्करला हुसकावून लावले व जखमी अलकाबाईची डुकराच्या तावडीतून सुटका केली़घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल के़एनख़ंदारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी साने गुरुजी रुग्णालयात धाव घेऊन जखमी महिलेला उपचारासाठी पाच हजार रुपयांची मदत केली़ घटनेचा पंचनामा करणे सुरू आहे़ डॉ़ अशोक बेलखोडे यांनी जखमी महिलेवर उपचार केले़ प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे त्यांनी सांगितले़जंगलात पाण्याची सोय नसल्याने वन्यप्राणी मानव वस्तीकडे येऊ लागले आहेत़ त्यातूनच मानवावर हल्ले होत आहेत़ तसेच याचा फायदा घेऊन शिकारी वन्यप्राण्यांची शिकार करत असल्याच्या घटनाही घडत आहेत. वनविभागाने जंगलात पाणवठे निर्माण करण्याची मागणी होत आहे़ पाणवठयाबाबत वनक्षेत्रपाल के़एनख़ंदारे यांना विचारले असता जंगलात नैसर्गिक पाणवठे असून वनविभागाने पाणवठे निर्माण केले नसल्याचे सांगत निचपूर भागात मोठा तलाव आहे़
रानडुकराचा महिलेवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:45 AM
तळ्याच्या काठावर असलेल्या शेतात कापूस वेचणी करणाऱ्या ३२ वर्षीय महिलेवर रानडुक्कराने हल्ला चढवून जखमी केले. ही घटना २४ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता किनवट तालुक्यातील निचपूर शिवारात घडली़ जखमी महिलेवर साने गुरुजी रुग्णालयात डॉ़ अशोक बेलखोडे यांनी उपचार केले़
ठळक मुद्देनिचपूरची घटना : आरडाओरड केल्यामुळे वाचला जीव